मुंबई

शौचालय बांधणीत चालढकल: कंत्राटदारांवर कारवाई; वेळकाढूपणा केला तर ५ लाखांपर्यंत दंड ठोठावा- अतिरिक्त आयुक्तांचे आदेश

पश्चिम उपनगरात सल्लागारांनी ९५ नकाशे मंजुरीसाठी सादर केले. त्यापैकी ४९ नकाशांची छाननी वस्ती स्वच्छता कार्यक्रम विभागाने केली

Swapnil S

मुंबई : मुंबई शहर व दोन्ही उपनगरात लॉट १२ अंतर्गत सामुदायिक शौचालय बांधण्यात येत आहेत; मात्र शौचालय बांधणीत चालढकल करणाऱ्या २८ पैकी १६ कंत्राटदारांवर दंडात्मक कारवाई करत प्रत्येकी ५ लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे, तर सध्या सुरू असलेल्या कामात वेळकाढूपणा व चालढकल करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करत ५ लाखांपर्यंत दंड वसूल करावा, असे सक्त आदेश मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी संबंधितांना दिले आहेत.

दरम्यान, राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजगता व नाविन्यता मंत्री तथा मुंबई उपनगरे जिल्हा पालक मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या आदेशानुसार पालिका क्षेत्रात सामुदायिक शौचालय बांधण्याच्या कामाची आढावा बैठक शुक्रवारी पार पडली.

मुंबई शहर व दोन्ही उपनगरात लॉट १२ अंतर्गत ७७ सामुदायिक शौचालय बांधण्यास सुरुवात झाली आहे, तर ७२ ठिकाणी शौचालय बांधणीचे आराखडे मंजूर करण्यात आले आहेत, तर शहर विभागात सामुदायिक शौचालय बांधकामाचे १८ नकाशे मंजुरीसाठी सादर करण्यात आले आहेत. त्यापैकी वस्ती स्वच्छता कार्यक्रम विभागाने ८ आराखडे मंजूर केले आहेत. पूर्व उपनगर विभागामध्ये सल्लागारांनी ९४ नकाशे सादर केले, त्यापैकी ४० नकाशांची छाननी वस्ती स्वच्छता कार्यक्रम विभागाने केली. ३० आराखडे मंजूर करण्यात आले आहेत, तर एकूण ४० ठिकाणी प्रत्यक्ष कामास सुरुवात झाली आहे.

केवळ १७ ठिकाणी कामास सुरुवात

पश्चिम उपनगरात सल्लागारांनी ९५ नकाशे मंजुरीसाठी सादर केले. त्यापैकी ४९ नकाशांची छाननी वस्ती स्वच्छता कार्यक्रम विभागाने केली. ३४ शौचालयांचे आराखडे मंजूर करण्यात आले असून, १७ ठिकाणी प्रत्यक्ष कामास सुरुवात झाली आहे. पश्चिम उपनगरातील कंत्राटदारांच्या कामांच्या प्रगतीबाबत असमाधान व्यक्त करत कंत्राटदारांच्या कामाचा प्रगतीनिहाय आढावा घ्यावा व कामाचे मूल्यमापन करून ५ लाख रुपयांपर्यंत दंड आकारा, असे आदेश डॉ. शिंदे यांनी संबंधितांना दिले.

मुंबईत कोसळधार! पुढील काही तास धोक्याचे, ‘रेड अलर्ट’ जारी

मराठवाड्यात पावसाचा कहर; धाराशिव-छत्रपती संभाजीनगरमध्ये पूरस्थिती तीव्र, जायकवाडी धरणाचे दरवाजे उघडले

करूर चेंगराचेंगरी : मृतांची संख्या ३९ वर; विजय थलापतींकडून २० लाखांची मदत जाहीर, तपास समिती नियुक्तीचे आदेश

ठाण्यात पावसाचा जोर कायम; सखल भागांत पाणी साचले, नवरात्र आणि गरब्यावर पावसाचे सावट

Marathwada Floods : मराठवाड्यावर पुन्हा पुरसंकट; बीड, लातूर, धाराशिवमध्ये जोरदार पाऊस, जनजीवन विस्कळीत