मुंबई

एकनाथ आव्हाड यांच्या पुस्तकांचा विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समावेश

बालसाहित्याचा समावेश बालभारतीच्या पाठ्यपुस्तकातही करण्यात आलेला आहे

नवशक्ती Web Desk

मुंबई : एकनाथ आव्हाड यांच्या पुस्तकांचा विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समावेश सुप्रसिद्ध बालसाहित्यिक, कथाकथनकार एकनाथ आव्हाड यांचा साहित्य अकादमी पुरस्कार विजेता 'छंद देई आनंद' या बालकवितासंग्रहाचा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात तसेच आव्हाड यांचा 'आनंदाची बाग' या बालकथासंग्रहाचा स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात एम. ए. च्या अभ्यासक्रमासाठी या वर्षापासून समाविष्ट करण्यात आला आहे.

एकनाथ आव्हाड यांची आतापर्यंत तीस पुस्तके प्रसिद्ध झालेली असून, त्यांच्या पुस्तकांना महाराष्ट्र शासनाचे वा. गो. मायदेव आणि बालकवी पुरस्कार लाभलेले आहेत. तसेच त्यांच्या पुस्तकांचे हिंदी, इंग्रजी आणि ब्रेल लिपीत अनुवाद झालेले असून, त्यांच्या बालसाहित्याचा समावेश बालभारतीच्या पाठ्यपुस्तकातही करण्यात आलेला आहे.

BCCI ची नक्वींविरोधात तक्रार! आता ICC च्या भूमिकेकडे लक्ष; नक्वींचा मात्र भारताला चषक देण्यास नकार कायम

NPS आता अधिक आकर्षक; आजपासून १०० टक्के समभागात गुंतवणुकीची परवानगी

रिलायन्स इन्फ्रावर ‘ईडी’चे छापे; फेमा कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप

एका चार्जमध्ये १२० किमी; ४ लाख रुपये किंमत; भारतात चालकविरहीत ‘स्वयंगती’ ऑटो बाजारात

SIR मधून ६९ लाख नावे हटवली; बिहारमध्ये अंतिम मतदार यादी जाहीर