मुंबई

भारतीय नौदलाचे हेलिकॉप्टर कोसळले मुंबईच्या समुद्र किनारी; जवानांना वाचवण्यात यश

भारतीय नौदलाचे ध्रुव हेलिकॉप्टर आज मुंबईच्या समुद्र किनारी कोसळल्याने एकच खळबळ उडाली. मात्र यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही

प्रतिनिधी

आज भारतीय नौदलाच्या हेलिकॉप्टरसोबत एक अपघात घडला. नौदलाचे ध्रुव हेलिकॉप्टर हे नियमित उड्डाण करत असताना मुंबईच्या किनाऱ्यावर कोसळले. यामध्ये हेलिकॉप्टरचे मोठे नुकसान झाले असून यातील ३ भारतीय जवानांना वाचवण्यात यश आले आहे.

अपघात घडल्यानंतर तातडीने नौदलाने शोध आणि बचाव मोहीम राबवली. तसेच, या घटनेच्या चौकशी आदेश देण्यात आले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय नौदलाचे एएलएच मुंबईपासून नियमित उड्डाण करत असताना किनाऱ्याजवळ अपघात घडला. हेलिकॉप्टर कसे कोसळले? आणि अपघात कसा झाला? हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही. नौदलाकडून अपघाताच्या चौकशीचे आदेश देण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली आहे.

आजचे राशिभविष्य, १२ जुलै २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Sunday Special Recipe : बाजारासारखे क्रिस्पी चिकन पॉपकॉर्न आता घरीच, वाचा सोपी रेसिपी

Women's Office Bag Collection: लॅपटॉप, टिफिन, फाईल्स... सगळं मावेल अशा ८ ट्रेंडी बॅग्ज

केस गळतायत? आहारात 'हे' पदार्थ जरूर ठेवा

व्हिएतनाममध्ये भारतीय पर्यटकांची बोट उलटली; बचावकार्य युद्धपातळीवर, दूतावासाकडून हेल्पलाइन सुरू