मुंबई

आजीची विवाहित नातीकडून फसवणूक

पूनम प्रदीप भंडारी या नातीविरुद्ध घाटकोपर पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. तिच्यावर एफडीच्या सुमारे पावणेदहा लाखांचा अपहार करून फसवणूक केल्याचा आरोप आहे.

Swapnil S

मुंबई : आजीची तिच्याच नातीने फसवणूक केल्याचा प्रकार घाटकोपर परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी पूनम प्रदीप भंडारी या नातीविरुद्ध घाटकोपर पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. तिच्यावर एफडीच्या सुमारे पावणेदहा लाखांचा अपहार करून फसवणूक केल्याचा आरोप आहे.

वृद्धा तिच्या मुलासोबत घाटकोपर येथे राहते. तिच्या दोन मुलांचे निधन झाले आहे. त्यातील एका मुलाची पूनम ही मुलगी आहे. ती तिच्या पतीसोबत राहते. चार वर्षांपूर्वी तिने तक्रारदार महिलेला केवायसी अपडेटच्या बहाण्याने बँकेत आणले होते. तिथे काही फॉर्मवर तिची स्वाक्षरी घेतली होती. त्यानंतर तिने तिच्या बँक खात्यातील तीन एफडी तोडून सुमारे पावणेदहा लाख रुपये तिच्या बँक खात्यात ट्रान्स्फर केले होते. हा प्रकार अलीकडेच तक्रारदार महिलेच्या लक्षात येताच तिने पूनमला जाब विचारला होता.

मराठवाड्यात संततधार पाऊस; गावांचा संपर्क तुटला, जनजीवन विस्कळीत

"हास्यास्पद नाटकं करून सत्य लपवता येत नाही"; संयुक्त राष्ट्रांत पाकिस्तानवर भारताचा घणाघात

Maharashtra Rain : राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार; हवामान खात्याचा इशारा

गायक झुबीन गर्ग मृत्यू प्रकरण : आयोजक व मॅनेजरवर लुकआउट नोटीस जारी; मुख्यमंत्री सरमा म्हणाले, अन्यथा...

MPSC ची राज्यसेवा परीक्षा पुढे ढकलली