संग्रहित छायाचित्र
मुंबई

विवाहितेला 'तू खूप सुंदर दिसतेस' म्हणणे गुन्हाच; पालिका अधिकाऱ्याचे शिक्षेविरोधातील अपील कोर्टाने फेटाळले

विवाहित महिलेच्या सुंदरतेचे कौतुक करीत रात्री उशिरा मोबाईलवर मेसेज पाठवणाऱ्या पालिका अधिकाऱ्याला सत्र न्यायालयाने चांगलाच दणका दिला.

Swapnil S

मुंबई : विवाहित महिलेच्या सुंदरतेचे कौतुक करीत रात्री उशिरा मोबाईलवर मेसेज पाठवणाऱ्या पालिका अधिकाऱ्याला सत्र न्यायालयाने चांगलाच दणका दिला. एखाद्या विवाहित महिलेला रात्रीच्या सुमारास मोबाईलवर सलग मेसेज पाठवणे आणि 'तू खूप सुंदर दिसतेस, तू खूप गोरी आहेस, तू मला आवडतेस' असे म्हणणे हा महिलेच्या प्रतिष्ठेला धक्का देणारा गुन्हाच आहे, असे स्पष्ट करत अतिरिक्त सत्र न्यायाधीश दत्ता ढोबळे यांनी आरोपी नरसिंग गुडे या पालिका अधिकाऱ्याचे शिक्षेविरोधातील अपील फेटाळून लावले.

बोरिवली पूर्वेकडील रहिवाशी असलेल्या नगरसेविका महिलेला अश्लील मेसेज पाठवल्याप्रकरणी पालिका अधिकारी नरसिंग गुडे याला बोरिवली दंडाधिकारी न्यायालयाने १० ऑगस्ट २०२२ रोजी दोषी ठरवले होते. याप्रकरणी तीन महिन्यांच्या साध्या कारावासासह १ हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली होती. त्या शिक्षेविरोधात गुडेने सत्र न्यायालयात अपील दाखल केले होते. त्याचे हे अपील अतिरिक्त सत्र न्यायाधीश दत्ता ढोबळे यांनी फेटाळून लावताना या प्रकारामुळे विवाहित महिलेच्या प्रतिष्ठेला धक्का बसला असल्याचे म्हटले.

नेमके प्रकरण काय?

मुलुंड पश्चिमेकडे राहणाऱ्या नरसिंग गुडे याने बोरिवली येथील नगरसेविका महिलेला रात्री ११.३० च्या सुमारास अज्ञात मोबाइल नंबरवरून २० ते २५ मेसेज पाठवले. त्यात 'तू झोपलीस का? तू विवाहित आहेस की नाही, तू खूप सुंदर दिसतेस, तू खूप गोरी आहेस, मला तू आवडतेस, माझे वय ४० वर्षे आहे, उद्या भेटू' असे म्हटले होते. तसेच काही अश्लील छायाचित्रेदेखील पाठवली होती. महिलेने याबाबत पतीला कळवले. पतीने अज्ञात नंबरवर कॉल केला. मात्र समोरील व्यक्तीने तो कॉल उचलला नाही. परंतु लगेचच त्याने काही मेसेज पाठवले. त्यात 'सॉरी मी रात्री कॉल उचलू शकत नाही. कशा आहात? मला चॅटिंग करायला आवडते. तुम्ही ऑनलाईन या' असे म्हटले होते.

मुंबईसह राज्यातील कबुतरखाने बंद होणार; उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती

बाळ चोरीला गेल्यास रुग्णालयाची नोंदणी रद्द होणार; राज्य सरकारचा निर्णय

मुंबई, दिल्ली मेट्रो शहरांचा झगमगाट आता संधीच्या नकाशावर मागे! आता Freshers साठी चेन्नई ठरतंय पगाराचा नवा 'हॉटस्पॉट'

आता २४ तास वाळू वाहतूक; GPS, CCTV बसवणे बंधनकारक; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सभागृहात घोषणा

सरकारी यंत्रणा शेतकऱ्यांची मारेकरी! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राहुल गांधी आक्रमक