मुंबई

जे. जे. रुग्णालयात अत्याधुनिक मॉलीक्युलर लॅबोरेटरीचे उद्घाटन

जगात दररोज नवनवीन विषाणूजन्य आजार फैलावत आहेत. त्यामुळे अद्यावत लॅबला देखील महत्व प्राप्त होत आहे

प्रतिनिधी

कोविडनंतर पालिका तसेच शासकीय रुग्णालयातील सेवा अद्यावत करण्यावर प्रशासनाकडून भर दिला जात आहे. बुधवारी अशाच प्रकारच्या अत्याधुनिक मॉलीक्युलर लॅबोरेटरीचे उद्घाटन राज्य सरकारच्या जे. जे. रुग्णालयात करण्यात आले. कोविड तसेच सध्या जगात पसरत असलेल्या मंकीपॉक्ससारख्या आजारांची नमुना चाचणी या लॅबमध्ये होऊ शकते, असे जे. जे. रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांनी सांगितले.

जगात दररोज नवनवीन विषाणूजन्य आजार फैलावत आहेत. त्यामुळे अद्यावत लॅबला देखील महत्व प्राप्त होत आहे. असे असताना जे. जे. रुग्णालयातील लॅबला राज्य पातळीवर महत्वाचे स्थान निर्माण होणार आहे. या लॅबची मोठी मदत होणार असल्याचे तज्ज्ञ सांगत आहेत. दरम्यान शासकीय महाविद्यालय व ज. जी. समूह रुग्णालयाच्या सुक्ष्मजीवशास्त्र विभागांतर्गत झालेल्या लॅब उद्घाटनामुळे मुंबईसह राज्याच्या रुग्णसेवेला दिलासा मिळणार आहे. या कोविड मॉलीक्युलार लॅबोरेटरीचे उदघाटन अधिष्ठाता डॉ.पल्लवी सापळे, ग्रांशासवैम व सर जजीरु, मिकी दोशी, व्यवस्थापकीय संचालक कविता शहा सीईओ, कंसर्न इंडिया फाऊंडेशन यांच्या हस्ते करण्यात आले.

प्रयोगशाळेला लागणाऱ्या पायाभूत सुविधांसह विविध उपकरणे तसेच अन्य महत्वाच्या बाबी सीएसआर निधीतून मिळाल्या. राष्ट्रीय स्तरावरील एन.ए.बी.एल. मानांकन मिळालेली ही प्रयोगशाळा जलद गतीने तसेच दर्जात्मक निदान होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. यासाठी कंसर्न इंडिया ग्रुपकडून निधी देण्यात आला आहे.

आर्थिक स्थिती ठणठणीत! राज्याच्या अर्थव्यवस्थेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती; हिवाळी अधिवेशनाची अखेर सांगता

बहुस्तरसत्ताक समाजातील शिक्षण प्रश्न

शेतकरी केंद्रित महसूल क्रांती!

आजचे राशिभविष्य, १५ डिसेंबर २०२५ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Sydney Mass Shooting: सिडनीतील बॉन्डी बीचवर भीषण गोळीबार; १० जणांचा मृत्यू, अनेकजण जखमी