मुंबई

हायकोर्टाच्या बनावट आदेशाच्या आधारे फसवणूक; वकिलाला जामीन नाकारला

उच्च न्यायालयाच्या बनावट आदेशाच्या आधारे वृद्ध महिलेची फसवणूक करणाऱ्या वकिलाला सत्र न्यायालयाने मोठा दणका दिला. २.५७ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप असलेल्या विनयकुमार खातूला जामीन मंजूर करण्यास न्यायालयाने स्पष्ट नकार दिला.

Swapnil S

मुंबई : उच्च न्यायालयाच्या बनावट आदेशाच्या आधारे वृद्ध महिलेची फसवणूक करणाऱ्या वकिलाला सत्र न्यायालयाने मोठा दणका दिला. २.५७ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप असलेल्या विनयकुमार खातूला जामीन मंजूर करण्यास न्यायालयाने स्पष्ट नकार दिला. वकिलाची पूर्वीची गुन्हेगारी पार्श्वभूमी आणि गंभीर आरोपांमुळे तो जामिनासाठी अपात्र आहे, असे निरीक्षण नोंदवत अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. जी. रघुवंशी यांनी वकिल विनयकुमार खातूला दिलासा देण्यास नकार दिला.

खातूने यापूर्वी दिल्ली आणि केरळमध्ये भारतीय प्रशासकीय सेवा (आयएएस) अधिकारी असल्याची बनावट ओळख निर्माण केली होती. त्या ओळखीच्या आधारे फसवणूक केल्याबद्दल त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपी खातूवर याआधीच दोन गुन्हे दाखल आहेत.

अमेरिकेचा भारताला तडाखा; भारतीय ‌वस्तूंवर १ ऑगस्टपासून २५ टक्के ‘टॅरिफ’

‘निसार’ उपग्रहाचे इस्रोकडून यशस्वी प्रक्षेपण; घनदाट जंगल व अंधारातही छायाचित्र टिपण्याची क्षमता

मालेगाव बॉम्बस्फोटाचा आज निकाल

२०११ पर्यंतच्या झोपडीधारकांना लॉटरी! मिळणार ५०० चौरस फुटांचे घर; शासकीय भूखंडावरील अतिक्रमणधारकांना राज्य सरकारचा दिलासा

काश्मीरमध्ये चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा