संग्रहित छायाचित्र
मुंबई

एलएलएम प्रवेशपूर्व परीक्षा आता १७ नोव्हेंबरला

मुंबई विद्यापीठातर्फे नियोजित केलेल्या एलएलएम प्रवेशपूर्व परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. १० नोव्हेंबरला होणाऱ्या ऑनलाईन सीबीटी परीक्षेच्या वेळापत्रकात बदल केला आहे.

Swapnil S

मुंबई : मुंबई विद्यापीठातर्फे नियोजित केलेल्या एलएलएम प्रवेशपूर्व परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. १० नोव्हेंबरला होणाऱ्या ऑनलाईन सीबीटी परीक्षेच्या वेळापत्रकात बदल केला आहे. नवीन वेळापत्रकानुसार ही परीक्षा १७ नोव्हेंबर रोजी होणार आहे. या परीक्षेसाठी आजमितीस सुमारे ४ हजार ५०० हून अधिक विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर केले आहेत. मुंबई विद्यापीठाने ७ ते १४ नोव्हेंबर दरम्यान संपूर्ण भारतात आयआयबीएफ च्या माध्यमातून सीओ/ पीओच्या परीक्षा नियोजित केली आहे. परीक्षार्थींना संभाव्य अडचण उद्भवू नये, यासाठी विद्यार्थी हित लक्षात घेता ही ऑनलाईन एलएलएम प्रवेशपूर्व परीक्षा १० नोव्हेंबरऐवजी १७ नोव्हेंबर रोजी घेण्यात येणार असल्याचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालिका डॉ. पूजा रौंदळे यांनी सांगितले.

GST आता फक्त ५ आणि १८ टक्के; नवीन दराचा ‘घट’ २२ सप्टेंबरपासून

मराठा आरक्षणाच्या जीआरवरून OBC नेत्यांमध्ये मतमतांतरे; जीआर प्रत फाडत लक्ष्मण हाके यांचे आंदोलन; भुजबळांचा कोर्टात जाण्याचा इशारा

Maratha Reservation Protest : सार्वजनिक मालमत्तेच्या नुकसान भरपाईचे काय? उच्च न्यायालयाचा मराठा आयोजकांना सवाल

Mumbai : २३८ एसी लोकल खरेदीला मंजुरी; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४८२६ कोटींची मान्यता

कोकणातून परतणाऱ्या गणेशभक्तांचे हाल; मुंबई-गोवा महामार्गावर ३ किमीपर्यंत वाहनांच्या रांगाच रांगा