मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी शाही खानपान; खानपानावर प्रत्येक वर्षी ९ कोटी ८५ लाख रुपयांचा खर्च 'एआय' ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
मुंबई

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी शाही खानपान; खानपानावर प्रत्येक वर्षी ९ कोटी ८५ लाख रुपयांचा खर्च

आखाती युद्धामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकीकडे देशवासीयांना काटकसरीचे आवाहन केले असताना, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी शाही खानपान सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

Swapnil S

मुंबई : आखाती युद्धामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकीकडे देशवासीयांना काटकसरीचे आवाहन केले असताना, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी शाही खानपान सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यासाठी दरवर्षी ९ कोटी ८५ लाख रुपये सरकारी तिजोरीतून खर्च केले जाणार आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘वर्षा’, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘नंदनवन’ आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या ‘देवगिरी’ या शासकीय निवासस्थानी येणाऱ्या अभ्यागतांचे, अतिथींचे आदरातिथ्य करण्यासाठी सुखसागर हॉस्पिटॅलिटी सर्विसेस या सेवा पुरवठादाराची निवड झाली आहे. सामान्य प्रशासन विभागाने सोमवारी यासंदर्भातील शासन निर्णय जारी केला.

कंत्राटाचा कालावधी २० जुलै २०२६ ते १९ जुलै २०३० असा आहे. त्यामुळे पुढील चार वर्षात सरकारी तिजोरीवर ३९ कोटी ४० लाख रुपयांचा भार पडणार आहे.

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी शासकीय बंगल्यावर येणाऱ्यांना बटाटेवडा, पंजाबी सामोसा, पट्टी समोसा, कचोरी कोथिंबिर वडी, मिसळ, पावभाजी, मटण बिर्याणी, चिकन बिर्याणी, ड्रायफ्रूटस, मोदक, उकडीचे मोदक, काजू मोदक असा खास बेत असणार आहे.

व्हीव्हीआयपींना ‘शाही दावत’

अतिमहत्त्वाच्या अर्थात व्हीव्हीआयपी आणि व्हीआयपी व्यक्तींसाठी लंच, डिनरची शाही दावत दिली जाईल. त्यासाठी व्हीव्हीआयपी आणि व्हीआयपी स्पेशल बुफे लंच आणि डिनरची ५२० रुपयांची नवीनच डिश सुरू केली आहे. व्हीव्हीआयपी-व्हीआयपी मांसाहारी लंच आणि डिनर ६२० रुपयांच्या दराने उपलब्ध करून दिले आहे. व्हीव्हीआयपी आणि व्हीआयपी मंडळींसाठी शाकाहारी-मांसाहारी लंच आणि डिनरचा दर ७२० रुपये आहे.

वाढत्या महागाईची झळ

दरम्यान, वाढत्या महागाईची झळ मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या खानपान सेवेला बसली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावेळी चहा, कॉफी आणि इतर पदार्थांचे दर वाढले आहेत.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

IIT बॉम्बेतील साहिल वाकोडे आत्महत्येप्रकरणी प्राध्यापक निलंबित; 'त्या' निवेदनावरून संस्थेची माफी

Mumbai : ‘बटरफ्लाय’ रोखणार पाणी गळती; जलवाहिन्यांवर बटरफ्लाय झडपा बसवणार, गणेश खणकर यांच्या मागणीची दखल

Mumbai : चौपाटी, विसर्जनस्थळी चोख व्यवस्थापन; देशभरातील तज्ज्ञांकडून पालिका, पोलिसांचे कौतुक

गणेश विसर्जनासाठी BMC सज्ज; ३८३ कृत्रिम तलावांची व्यवस्था, ६७ नैसर्गिक विसर्जनस्थळांवरही सुविधा, २५ हजार अधिकारी-कर्मचारी तैनात

बार्सिलोनामध्ये ‘गणपती बाप्पा मोरया’; महाराष्ट्र मंडळ स्पेनतर्फे गणेशोत्सव, स्पॅनिश कलाकारांचाही सहभाग