मुंबई

मालाड स्थानक अतिक्रमणमुक्त ; एका आठवड्यात ४० बेकायदा दुकाने जमीनदोस्त

नवशक्ती Web Desk

अनधिकृत बांधकामामुळे वर्षानुवर्षे वाहतूक कोंडीचा सामना करणाऱ्या मालाडकरांना दिलासा मिळाला आहे. वाहतुकीस अडथळा ठरणारी एम. एम. मिठाईवालासह ४०हून अधिक अनधिकृत दुकाने जमीनदोस्त करण्यात आली आहे. त्यामुळे मालाड पश्चिम येथील रस्ता रुंदीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे.

मुंबई उपनगराचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या जनता दरबारात येथील स्थानिक रहिवाशांनी वाढत्या वाहतूक कोंडीची समस्या मांडली होती. मालाड मधील वाहतुकीस अडथळा ठरणारी बेकायदा बांधकामे जमीनदोस्त करा, असे निर्देश लोढा यांनी दिले आणि पी उत्तर विभागाचे सहायक आयुक्त किरण दिघावकर यांनी एक महिन्यात बेकायदा बांधकामे जमीनदोस्त करण्यात येतील, असे आश्वासन दिले होते. रस्ता रुंदीकरणाचा मार्ग मोकळा करुन देण्याची जबाबदारी सहायक अभियंता मंदार चौधरी यांच्यावर सोपवण्यात आली. चौधरी यांच्या नेतृत्वाखाली एका आठवड्यात मालाड पश्चिम येथील ४०हून अधिक बेकायदा बांधकामे जमीनदोस्त करण्यात आल्याने मालाड पश्चिम येथील वाहतूक कोंडीची समस्या दूर झाली असून रस्ता रुंदीकरणाचा मार्ग मोकळा झाल्याचे पी उत्तर विभागाचे सहायक आयुक्त किरण दिघावकर यांनी सांगितले.

ठाकरे गटाचा पाठिंबा घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही! ‘एनडीए’ला बहुमत मिळणार; देवेंद्र फडणवीस यांना विश्वास

वांद्रे ते मरीन ड्राईव्ह फक्त १२ मिनिटांत! २.५ हजार मेट्रिक टन वजनाचा गर्डर लाँच

होर्डिंगचा पाया मजबूत होता का? व्हीजेटीआय करणार ऑडिट; स्ट्रक्चरल ऑडिट रिपोर्ट सादर करण्याचा पालिकेचा आदेश

नवी मुंबई: 'रेप' केसला नाट्यमय वळण; आईसह बॉयफ्रेंडवर FIR; ६ वर्षांच्या मुलालाच 'तो' व्हिडिओ रेकॉर्ड करायला सांगितला

अटक, कोठडी बेकायदेशीर! 'न्यूजक्लिक'च्या संस्थापकांना दिलासा; सर्वोच्च न्यायालयाने दिले सुटकेचे आदेश