मुंबई

Mumbai : बेस्ट बस तोडफोड, प्रवाशाला मारहाणप्रकरणी आंदोलनकर्त्यांवर गुन्हा दाखल

मराठा आरक्षण आंदोलनकर्त्यांनी एका प्रवाशाला मारहाण करून बेस्ट बसची तोडफोड केल्याप्रकरणी अज्ञात १० जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जुहू डेपोवर रविवारी सायंकाळी बसमध्ये बसण्याच्या वादावरून आंदोलनकर्त्यांनी एका प्रवाशाला मारहाण करून बसची काच फोडली, अशी माहिती पोलिसांनी दिली.

Swapnil S

मुंबई : मराठा आरक्षण आंदोलनकर्त्यांनी एका प्रवाशाला मारहाण करून बेस्ट बसची तोडफोड केल्याप्रकरणी अज्ञात १० जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जुहू डेपोवर रविवारी सायंकाळी बसमध्ये बसण्याच्या वादावरून आंदोलनकर्त्यांनी एका प्रवाशाला मारहाण करून बसची काच फोडली, अशी माहिती पोलिसांनी दिली. घटना घडली तेव्हा बस डेपोत उभी होती आणि चालक, वाहक तेथे नव्हते.

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये भगवे टोपी, गमछे घातलेले आंदोलनकर्ते आणि काही प्रवासी एकमेकांना मारताना दिसत आहेत.

बस कर्मचारी घटनास्थळी पोहोचल्यावर पोलिसांना खबर दिली गेली. मात्र, तेव्हा पर्यंत प्रवासी आणि आंदोलनकर्ते पळून गेले होते.

जुहू पोलिसांनी १० ते १२ अज्ञात आंदोलनकर्त्यांवर दंगल, मारहाण आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान या गुन्ह्यांखाली प्रकरण दाखल केले आहे.

कामगारांच्या कामाचे तास वाढणार नाहीत; कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्याकडून स्पष्टीकरण

ओबीसी महासंघाचे उपोषण मागे; राज्य सरकारकडून १४ पैकी १२ मागण्या मान्य

बेकायदेशीरपणे झाडे तोडल्यामुळे आपत्ती; पूर आणि भूस्खलनावर सुप्रीम कोर्टाची टिप्पणी

मुंबई, उपनगरात ईद-ए-मिलादच्या सुट्टीत बदल; ५ सप्टेंबरची सार्वजनिक सुट्टी आता ८ सप्टेंबरला

१३ सप्टेंबरला मोदी मणिपूर दौऱ्यावर? कुकी समूहासोबत शांतता करार