PM
मुंबई

सांताक्रुझ येथील हॉटेल रेसिडेन्सीमध्ये भीषण आग

सांताक्रुझ पश्चिम येथील १४८ / बी जुहू तारा रोड जेडब्लू मेरिट हॉटेल समोर तळ अधिक चार मजली जुहू रेसिडेन्सी हॉटेल आहे.

Swapnil S

मुंबई : सांताक्रुझ पश्चिम येथील जेडब्लू मेरिट हॉटेल समोरील हॉटेल रेसिडेन्सीच्या तिसऱ्या व चौथ्या मजल्यावर सोमवारी सायंकाळी ५.११ वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. काही वेळातच आग वाऱ्या सारखी पसरली आणि हॉटेलमध्ये धुराचे लोण पसरले. या दुर्घटनेत तिसऱ्या व चौथ्या मजल्यावर अडकलेल्या १० ते १२ जणांना रेस्क्यू केल्याचे मुंबई अग्निशमन दलाचे प्रमुख रवींद्र आंबुलगेकर यांनी सांगितले.

सांताक्रुझ पश्चिम येथील १४८ / बी जुहू तारा रोड जेडब्लू मेरिट हॉटेल समोर तळ अधिक चार मजली जुहू रेसिडेन्सी हॉटेल आहे. या हॉटेलच्या तिसऱ्या व चौथ्या मजल्यावर सोमवारी सायंकाळी ५.११ वाजण्याच्या सुमारास आग लागली. काही वेळातच आग वाऱ्यासारखी पसरली आणि लेवल वनची आग घोषित करण्यात आली. यावेळी तिसऱ्या व चौथ्या मजल्यावर १० ते १२ जण अडकले होते. मुंबई अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवत बचावकार्य सुरू केले. यावेळी अडकलेल्या १० ते १२ जणांना रेस्क्यू करण्यात आले.

दरम्यान, सायंकाळी ६.२० वाजता आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले असून, आगीचे नेमके कारण समजू शकलेले नाही. अग्निशमन अधिकारी, स्थानिक पोलीस व पालिकेचे अधिकारी पुढील तपास करीत असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

एकत्र आणणं माननीय बाळासाहेबांना जमलं नाही, ते देवेंद्र फडणवीसांना जमलं; राज ठाकरेंचा हल्लाबोल

''कुठचाही 'झेंडा' नाही, मराठी हाच 'अजेंडा'; माझ्या मराठीकडे-महाराष्ट्राकडे वेड्यावाकड्या नजरेने पाहायचं नाही,'' वाचा राज ठाकरे यांचं संपूर्ण भाषण

''जर इथे येऊन धंदा करताय तर मराठी बोलायची लाज कसली?'' अभिनेते भरत जाधव यांचा संतप्त सवाल

गुजरातेत हिंदी सक्ती नसेल, तर ती महाराष्ट्रात कशासाठी? खासदार सुप्रिया सुळे यांचा संतप्त सवाल

‘जय गुजरात’मुळे वादंग; अमित शहांपुढे उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या घोषणेमुळे विरोधक संतप्त