मुंबई

मध्य, हार्बर रेल्वे मार्गावर आज ब्लॉक; पश्चिम रेल्वे मार्गावरील प्रवाशांना दिलासा

Swapnil S

मुंबई : रुळांची दुरुस्ती ओव्हरहेड वायर दुरुस्ती सिंगल यंत्रणेची दुरुस्ती अशा विविध कामांसाठी रविवार, १८ फेब्रुवारी रोजी मध्य व हार्बर रेल्वे मार्गावर दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. दुरुस्तीच्या कालावधीत मध्य व हार्बर मार्गावरील काही लोकल उशिराने धावत असून, काही लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. दरम्यान, पश्चिम रेल्वे मार्गावरील मेगाब्लॉक रद्द करण्यात आल्याचे पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

मध्य रेल्वेच्या ठाणे-कल्याण अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी १०.४० ते दुपारी ३.४० वाजेपर्यंत दुरुस्तीचे काम सुरू आहे. या कालावधीत सीएसएमटी स्थानकातून सुटणाऱ्या डाऊन जलद/नीम-जलद लोकल ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात आल्या आहेत, तर कळवा, मुंब्रा व दिवा स्थानकांवर थांबणार आहेत, तर कल्याण स्थानकातून सुटणाऱ्या अप जलद/अर्धजलद सेवा कल्याण व ठाणे स्थानकांदरम्यान अप धीम्या मार्गावर वळवण्यात आल्या आहेत, तर दिवा, मुंब्रा आणि कळवा स्थानकांवर लोकल थांबणार आहेत.

हार्बर मार्गावर सीएसएमटी-चुनाभट्टी-वांद्रे डाऊन हार्बर मार्गावर सकाळी ११.४० ते सायंकाळी ४.४० पर्यंत दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. या कालावधीत सीएसएमटी स्थानकातून वाशी-बेलापूर-पनवेलसाठी डाऊन हार्बर मार्गावरील लोकल आणि सीएसएमटी येथून वांद्रे/गोरेगाव येथे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील लोकल रद्द करण्यात आल्या आहेत, तर पनवेल-बेलापूर-वाशी येथून सीएसएमटीच्या दिशेने जाणाऱ्या व गोरेगाव- वांद्रे स्थानकातून सीएसएमटीच्या दिशेने जाणाऱ्या लोकल सेवा रद्द करण्यात आल्या आहेत.

पनवेल ते कुर्ला विशेष लोकल!

ब्लॉक कालावधीत पनवेल ते कुर्ला (फलाट क्र. ८) दरम्यान २० मिनिटाने विशेष सेवा चालवण्यात येत आहेत. तर हार्बर मार्गावरील प्रवाशांना ब्लॉक कालावधीत मेन लाईन आणि पश्चिम रेल्वे मार्गावर प्रवास करण्याची परवानगी आहे.

पुणे विमानतळावर अपघात; 'टग ट्रॅक्टर'ला धडकले एअर इंडियाचे १८० प्रवाशांनी भरलेले विमान

कार्तिक आर्यनच्या नातलगांचा घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत मृत्यू, मुंबईत झाले अंत्यसंस्कार

होर्डिंग पॉलिसी लवकरच, तोपर्यंत नवीन होर्डिंगना परवानगी नाही

CSMT तील प्लॅटफॉर्म विस्तारीकरणासाठी आजपासून १५ दिवस ब्लॉक

घशाच्या इन्फेक्शनमुळे अजितदादा मोदींपासून दूर, आजपासून प्रचारात सहभागी होणार