मुंबई

हार्बर व पश्चिम रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक; मेन लाईनवर नो ब्लॉक

रुळांची दुरुस्ती ओव्हरहेड वायर दुरुस्ती सिंगल यंत्रणेची दुरुस्ती अशा विविध कामांसाठी रविवार, १४ जानेवारी रोजी हार्बर व पश्चिम रेल्वे मार्गावर दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे.

Swapnil S

मुंबई : रुळांची दुरुस्ती ओव्हरहेड वायर दुरुस्ती सिंगल यंत्रणेची दुरुस्ती अशा विविध कामांसाठी रविवार, १४ जानेवारी रोजी हार्बर व पश्चिम रेल्वे मार्गावर दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. या कालावधीत काही लोकल उशीराने धावत असून, काही लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. दरम्यान, मध्य रेल्वेच्या मेन लाईनवर मेगाब्लॉक रद्द करण्यात आल्याचे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले.

हार्बर मार्गावर वडाळा रोड ते मानखुर्द दरम्यान अप आणि डाऊन हार्बर लाईन सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. (छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-वांद्रे/गोरेगाव सेवा प्रभावित नाही) तर ब्लॉक कालावधीत वडाळा रोड ते मानखुर्द स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन हार्बर मार्गावरील लोकल सेवा बंद आहे. दुरुस्तीच्या कालावधीत सीएसएमटी स्थानकातून वाशी, बेलापूर, पनवेलसाठी डाऊन हार्बर मार्गावरील लोकल सेवा आणि वाशी, बेलापूर, पनवेल स्थानकातून सीएसएमटीच्या दिशेने जाणाऱ्या लोकल सेवा बंद आहेत.

दरम्यान, ब्लॉक कालावधीत सीएसएमटी वांद्रे - गोरेगाव दरम्यानच्या उपनगरीय रेल्वे सेवा वेळापत्रकानुसार सुरू आहेत. तर पनवेल ते मानखुर्द दरम्यान, विशेष लोकल सेवा चालवण्यात येत आहेत.

मेन लाईनवर प्रवासाची मुभा

हार्बर मार्गावरील प्रवाशांना ब्लॉक कालावधीत सकाळी १० ते दुपारी ४.३० पर्यंत ट्रान्स हार्बर लाईन आणि मेन लाईनवरून प्रवास करण्याची परवानगी आहे. पश्चिम रेल्वे मार्गावर सांताक्रुझ गोरेगाव दरम्यान अप व डाऊन जलद मार्गावर दुरुस्तीचे काम सुरू आहे. दुरुस्तीच्या कालावधीत सांताक्रुझ गोरेगाव स्थानकादरम्यान जलद मार्गावरील लोकल धीम्या मार्गावर वळवण्यात आल्या आहेत. बोरिवली व अंधेरीला जाणाऱ्या लोकल गोरेगाव स्थानकापर्यंत चालवण्यात येत आहेत.

Voter ID नसेल तर मतदान कसं करायचं? जाणून घ्या 'ही' महत्त्वाची माहिती

रस्त्यात सापडली ४५ लाखांच्या सोन्याच्या दागिन्यांनी भरलेली बॅग; सफाई कर्मचारी महिलेने जे केलं ते सगळ्यांना शक्य नाही!

Bigg Boss Marathi 6 : "तू मला शिकवणार..." नॉमिनेशन टास्कमुळे सागर कारंडे आणि तन्वी कोलतेमध्ये जबरदस्त राडा; थेट अरे-तुरेची भाषा

कल्याणमध्ये महायुतीच्या प्रचार रॅलीत झेंडा हाय टेन्शन वायरला लागून स्फोट; थोडक्यात टळली मोठी दुर्घटना, घटनेचा Video व्हायरल

Mumbai : हार्बरवर एसी लोकलचं पुनरागमन! २६ जानेवारीपासून सेवा पुन्हा सुरू; १४ फेऱ्यांचं संपूर्ण वेळापत्रक बघा एकाच क्लिकवर