मुंबई

राज्य वन्यजीव मंडळावरून आदित्य ठाकरे यांचे सदस्यत्व रद्द

संजय जोग

महाविकास आघाडी सरकारने नेमलेल्या राज्य वन्यजीव मंडळावरील १३ सदस्यांच्या नेमणुका राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने रद्द केल्या आहेत. यात माजी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, माजी राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे, धीरज देशमुख, अनुज खरे, विश्वास काटदरे, बिट्टू सहगल, किशोर रिठे, पूनम धनावटे, कुंदन हाटे, यादव तरटे-पाटील, सुहास वायंगणकर व रोहिदास डगले आदींचा समावेश आहे.

महाविकास आघाडी सरकारने राज्य वन्यजीव मंडळाची ऑगस्ट २०२० मध्ये पुन:स्थापना केली. मे २०२१मध्ये बिगर सरकारी सदस्यांच्या नेमणुका करण्यात आल्या. आता महसूल व वनविभागाने अधिसूचना काढून आदित्य ठाकरे व अन्य सदस्यांच्या नेमणुका रद्द केल्या आहेत.

शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाले. त्यानंतर वन्यजीव मंडळाची बैठक झाली. त्यात मंडळाच्या अध्यक्षपदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपाध्यक्षपदी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची निवड झाली. ही बैठक २१ सप्टेंबर रोजी झाली. सरकार लवकरच या मंडळाच्या नवीन सदस्यांची नियुक्ती करणार आहे. अनुज खरे, हेमंत ओगले, रमण कुलकर्णी, विनीत अरोरा, पूनम धनावटे, नितीन देसाई, जयंत कुलकर्णी, कौस्तुभ पांढरीपांडे, राजेश ठोंबरे, अभय उजागरे, सुहास वायंगणकर, स्वप्निल सोनाने, अंकुर पटवर्धन, धनंजय बापट, रोहिदास डगले, चैत्र पवार ही प्रस्तावित सदस्यांची नावे आहेत. राज्यातील ४९ वन्यजीव अभयारण्याबाबत धोरणात्मक निर्णय घेण्याचे अधिकार हे वन्यजीव मंडळाकडे आहे.

साताऱ्यात शरद पवार, देवेंद्र फडणवीस यांच्या सभा वेटिंगवर

म्हस्केंच्या उमेदवारीमुळे महायुतीत सुंदोपसुंदी; नवी मुंबईतील ६४ माजी नगरसेवकांचे राजीनामे

माजी आमदार उपरकर 'उबाठा' पक्षात प्रवेश करणार? आज उद्धव ठाकरे कणकवलीत आल्यानंतर भेट घेणार

राहुल गांधी रायबरेलीतून, अमेठीतून के. एल. शर्मा यांना काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर

तीन RTO अधिकाऱ्यांना अटक, चोरीच्या वाहनांची विक्री करणाऱ्या रॅकेटचा नवी मुंबई क्राईम ब्रांचकडून पर्दाफाश