मुंबई

"आव्हाड, मुंब्र्याच्या कुठल्या बिळात लपून बसलेत?"; मनसेच्या 'या' नेत्याची घणाघाती टीका

'पठाण' प्रदर्शित झाल्यानंतर मराठी चित्रपटांना मल्टिप्लेक्समध्ये मिळालेल्या कमी शोमुळे मनसे आक्रमक झाले आहेत

प्रतिनिधी

एकीकडे 'पठाण'ने रेकॉर्ड ब्रेक कमाई करत असून दुसरीकडे त्याच्या प्रदर्शनावरून होणार वाद काही कमी होत नाही. राज्यभरात सर्वच चित्रपटगृहात हा चित्रपट प्रदर्शित केल्यामुळे मराठी चित्रपटांची गळचेपी केल्याची टीका मनसेने केली होती. यावरून आता मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांना टोला लगावला आहे. ते म्हणाले की, "हर हर महादेव चित्रपटाच्या वेळेस प्रेक्षकांना चित्रपटगृहातून हुसकावणारे आव्हाड आता कुठे गेले? ‘पठाण’मुळे मराठी चित्रपटांना स्क्रीन्स मिळत नसताना आव्हाड मुंब्र्याच्या कोणत्या बिळात लपून बसलेत?" अशी घणाघाती टीका केली.

पठाण चित्रपटामुळे अनेक ठिकाणी चांगले चालत असलेले 'वेड', वाळवी' सारखे मराठी चित्रपट तसेच, ‘बांबू’ आणि ‘पिकोलो’ या मराठी चित्रपटांना मल्टीप्लेक्समध्ये अत्यंत कमी शो देण्यात आले. यावरून मनसे आक्रमक झाली असून "पठाणचे भले करा, पण मराठी चित्रपटांनाही त्यांचा वाटा द्यायलाच हवा. मल्टीप्लेक्स चालकांनी समंजसपणे वागावे, नाहीतर मग आम्ही येऊन ‘बांबू’ लावूच शकतो,' असा सज्जड दम त्यांनी भरला होता. "शाहरुख खानचा कमबॅक आहे, म्हणून मल्टीप्लेक्सवाल्यांनी ‘बांबू’ आणि ‘पिकोलो’ या चित्रपटांचा बळी का द्यावा?" असा सवाल त्यांनी विचारला होता.

गुजरातेत हिंदी सक्ती नसेल, तर ती महाराष्ट्रात कशासाठी? खासदार सुप्रिया सुळे यांचा संतप्त सवाल

आज विजयी मेळावा; उद्धव-राज ठाकरे वरळीत एकाच मंचावर येणार

‘जय गुजरात’मुळे वादंग; अमित शहांपुढे उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या घोषणेमुळे विरोधक संतप्त

हायकोर्टाची सुनावणी सोमवारपासून लाईव्ह; सुरुवातीला पाच न्यायमूर्तींचा समावेश

मथुरेची शाही ईदगाह मशीद वादग्रस्त संरचना नाही; अलाहाबाद उच्च न्यायालयाने हिंदू पक्षाची याचिका फेटाळली