मुंबई

केईएम रुग्णालयात मॉड्युलर नेत्रशस्त्रक्रियागार सुरू

Swapnil S

मुंबई : महापालिकेच्या केईएम रुग्णालयात उभारण्यात आलेल्या नव्या मॉड्युलर नेत्ररोग शस्त्रक्रियागाराच्या कामकाजाला गुरुवारी प्रारंभ झाला. या शस्त्रक्रियागारामुळे रुग्णांवर अत्याधुनिक पद्धतीने शस्त्रक्रिया करणे शक्य होणार आहे.

या शस्त्राक्रियागारात अत्याधुनिक तंत्रज्ञानासह लॅमिनर एअर फ्लो संरचना करण्यात आली आहे. त्यामुळे नेत्रविकार झालेल्या रुग्णांवरील शस्त्रक्रिया अधिक यशस्वी होणार आहेत. रुग्णांवर अधिक चांगले उपचार केले जाणार आहेत, अशी माहिती महापालिकेतर्फे देण्यात आली.

या नव्या शस्त्रक्रियागारामुळे केईएम रुग्णालयात आता तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत मोतीबिंदू, ग्लुकोमा, स्कीन्ट, रेटिना, कॉरनिया या विकारांवरील शस्त्रक्रियांबरोबरच नेत्ररुग्ण बालकांवरील शस्त्रक्रिया करणे शक्य होणार आहे.

हे शस्त्रक्रियागार सुरू करण्यासाठी महापालिका आयुक्त भूषण गगराणी तसेच अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभल्याचे येथील अधिकाऱ्यांनी सांगितले. केईएममधील नेत्ररोग विभागाच्या माजी प्रमुख डॉ. रुमी जहांगीर यांच्या हस्ते या शस्त्रक्रियागाराचा औपचारिक आरंभ झाला. या वेळी रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. संगीता रावत यांच्यासह इतर रुग्णालयीन कर्मचारीवर्ग उपस्थित होता.

शस्त्राक्रियागाराची वैशिष्ट्ये

  • लॅमिनर एअर फ्लो

  • निर्जंतुकीकरणासाठी उच्च वेगाचे तसेच पूर्णत: स्वयंचलित ॲटोक्लेव्ह मशीन (संयोग ट्रस्टतर्फे दान)

Jammu Kashmir Election : नंदनवनात आज अखेर मतदान; २४ जागांसाठी २१९ उमेदवार रिंगणात

One Nation, One Election ची अंमलबजावणी कधी? केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचे मोठे विधान

सुप्रीम कोर्टाने रोखला 'बुलडोझर न्याय'! आमच्या परवानगीशिवाय एकही पाडकाम नको; पुढील सुनावणीपर्यंत आदेश

सगेसोयरे अधिसूचनेवर सरकारनियुक्त समित्यांचे काम सुरू; कोणत्याही समाजाची फसवणूक करणार नाही - मुख्यमंत्री

विधानसभा निवडणुकीची आचार संहिता कधी लागू होणार? गिरिश महाजनांनी वर्तवले भाकीत