मुंबई

मुलुंड, भांडुपकरांना मिळणार नवीन मजबूत पूल; पालिका २१ कोटी रुपये खर्च करणार

भांडूप विभागातील बॉम्बे ऑक्सिजन नाला हा मोठा आहे. भांडूप पूर्वेकडे जाण्यासाठी कोपरकर मार्गे हा एकमेव मार्ग असून गोरेगाव-मुलुंड लिंक रोडच्या जंक्शनपासून उतार आहे. या लिंक रोडपासून सुमारे २३ मीटर अंतरावर बॉम्बे ऑक्सिजन नाला पूल आहे.

Swapnil S

मुंबई : मुलुंड पश्चिम येथील नानेपाडा नाल्यावरील पूल जीर्ण झाल्याने तो पाडून नव्याने पुनर्बांधणी करण्यात येणार आहे. तसेच मुलुंड पश्चिमेकडील एस. एल. रोड आणि पूर्वेकडील शिव मंदिराजवळील पूल व भांडूप येथील बॉम्बे ऑक्सिजन नाल्यावरील पुलाचे रूंदीकरण करत त्याची पुनर्बांधणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या पुलाच्या बांधकामासाठी मुंबई महापालिका २१.६९ कोटी रुपये खर्च करणार आहे.

भांडूप विभागातील बॉम्बे ऑक्सिजन नाला हा मोठा आहे. भांडूप पूर्वेकडे जाण्यासाठी कोपरकर मार्गे हा एकमेव मार्ग असून गोरेगाव-मुलुंड लिंक रोडच्या जंक्शनपासून उतार आहे. या लिंक रोडपासून सुमारे २३ मीटर अंतरावर बॉम्बे ऑक्सिजन नाला पूल आहे. नाहूर पुलाच्या प्रस्तावित रुंदीकरणामुळे हा उतार आणखी खडतर होऊन वाहनांच्या वाहतुकीला अडथळा ठरणार आहे. ही अडचण दूर करण्यासाठी सध्याच्या पुलाच्या रस्त्याची पातळी वाढवणे आवश्यक आहे. त्यामुळे या पूर्व रूंदीकरण आणि पुनर्बांधणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या सगळ्या पुलाच्या पुनर्बांधणीच्या कामासाठी २१ कोटी ६९ लाख २२ हजार रुपये खर्च केले जाणार आहेत. या कामांसाठी आर. ई. इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची निवड करण्यात आली आहे.

मुलुंड नानेपाडा नाल्यावरील पूल

  • पुलाची एकूण लांबी : १५.६७ मीटर

  • पुलाची एकूण रुंदी : १४ मीटर

  • नाल्यावरील पुलाची खोली : २. ८६ मीटर

  • स्पॅनची संख्या : २१

एलएल रोड आणि शिव मंदिराजवळील पूल

  • पुलाची एकूण लांबी : ११.०० मीटर

  • पुलाची एकूण रुंदी : १६. ४५७ मीटर

  • नाल्यावरील पुलाची खोली : २. ३५५ मीटर

  • स्पॅनची संख्या : २१

ऑक्सिजन नाल्यावरील पूल

  • पुलाची एकूण लांबी : १७.१० मीटर

  • पुलाची एकूण रुंदी : २५.१२ मीटर

  • नाल्यावरील पुलाची खोली : ३.९१० मीटर

  • स्पॅनची संख्या : २२

हरिनामाच्या गजराने विठ्ठलाची पंढरी दुमदुमली! पंढरीत १५ लाखांवर वैष्णवांची मांदियाळी; आषाढी एकादशीचा आज मुख्य सोहळा !

महागड्या शक्तिपीठ महामार्गाला आमचा विरोध; सुप्रिया सुळे यांचे ठाम प्रतिपादन

आवाज मराठीचाच! उद्धव-राज ठाकरे तब्बल २० वर्षांनंतर एकाच मंचावर; राज्यभरातील मराठी माणसांमध्ये आनंदाचे वातावरण

डोममध्ये रंगला झिम्मा; शर्मिला ठाकरे, सुषमा अंधारे यांची फुगडी

देशात गरीबांची संख्या वाढणे ही चिंता वाढवणारी बाब; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे प्रतिपादन