Mumbai : बेस्ट प्रवाशांचे हाल कायम; ४,५०० पैकी केवळ ७३५ ईव्ही एसी बसेस ताफ्यात प्रातिनिधिक छायाचित्र
मुंबई

Mumbai : बेस्ट प्रवाशांचे हाल कायम; ४,५०० पैकी केवळ ७३५ ईव्ही एसी बसेस ताफ्यात

बेस्ट उपक्रमाने ओलेक्ट्रा कंपनीकडून भाडेतत्त्वावर घेण्यात येणाऱ्या ४,५०० सिंगल डेकर वातानुकूलित (एसी) इलेक्ट्रिक बसपैकी आतापर्यंत केवळ ७३५ बसेस ताफ्यात दाखल झाल्या असून, तीन वर्षांनंतरही बस पुरवठा पूर्ण करण्यात कंपनीला अपयश आले आहे.

Swapnil S

मुंबई : बेस्ट उपक्रमाने ओलेक्ट्रा कंपनीकडून भाडेतत्त्वावर घेण्यात येणाऱ्या ४,५०० सिंगल डेकर वातानुकूलित (एसी) इलेक्ट्रिक बसपैकी आतापर्यंत केवळ ७३५ बसेस ताफ्यात दाखल झाल्या असून, तीन वर्षांनंतरही बस पुरवठा पूर्ण करण्यात कंपनीला अपयश आले आहे. यामुळे बेस्टच्या ताफ्यात अपेक्षित वाढ झाली नसल्याने प्रवाशांचे हाल कायम आहेत.

मुंबईतील बेस्ट प्रवाशांना वेळेत बेस्ट बस येईल, याची प्रतीक्षा आजही कायम आहे. उन्हाळा असो वा पावसाळा तासन् तास बसथांब्यावर बसची प्रतीक्षा करणे बसथांबे आणि स्थानकांची दुरवस्था, त्यावरील अतिक्रमणे तसेच अपुरा बसताफा यामुळे प्रवाशांची गैरसोय वाढली आहे.

बेस्टने २३ मे २०२३ रोजी २,१०० एसी इलेक्ट्रिक सिंगल डेकर बस पुरविण्याचे कंत्राट ओलेक्ट्रा ग्रीनटेक लिमिटेडला दिले होते. या करारानुसार आतापर्यंत सर्व बस ताफ्यात दाखल होणे अपेक्षित होते. मात्र प्रत्यक्षात केवळ ६८६ बसेस दाखल झाल्या आहेत. त्यानंतर सुमारे दीड वर्षांपूर्वी याच कंपनीला आणखी २,४०० एसी इलेक्ट्रिक बसेस पुरविण्याचे कंत्राट देण्यात आले.

स्वमालकीच्या बसेसची संख्याही घटली

सध्या बेस्टच्या ताफ्यात सुमारे २,८०० बस असून त्यापैकी २४९ बस स्वमालकीच्या, तर उर्वरित भाडेतत्त्वावरील आहेत. याउलट २०२२-२३ मध्ये बेस्टकडे ३,५६९ बस होत्या. त्यामध्ये १,८८१ स्वमालकीच्या आणि १,६८८ भाडेतत्त्वावरील बसेसचा समावेश होता. गेल्या काही वर्षांत स्वमालकीच्या बसेसची संख्या मोठ्या प्रमाणात घटली आहे.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

IIT बॉम्बेतील साहिल वाकोडे आत्महत्येप्रकरणी प्राध्यापक निलंबित; 'त्या' निवेदनावरून संस्थेची माफी

Mumbai : ‘बटरफ्लाय’ रोखणार पाणी गळती; जलवाहिन्यांवर बटरफ्लाय झडपा बसवणार, गणेश खणकर यांच्या मागणीची दखल

Mumbai : चौपाटी, विसर्जनस्थळी चोख व्यवस्थापन; देशभरातील तज्ज्ञांकडून पालिका, पोलिसांचे कौतुक

गणेश विसर्जनासाठी BMC सज्ज; ३८३ कृत्रिम तलावांची व्यवस्था, ६७ नैसर्गिक विसर्जनस्थळांवरही सुविधा, २५ हजार अधिकारी-कर्मचारी तैनात

बार्सिलोनामध्ये ‘गणपती बाप्पा मोरया’; महाराष्ट्र मंडळ स्पेनतर्फे गणेशोत्सव, स्पॅनिश कलाकारांचाही सहभाग