Mumbai : बेस्टच्या ताफ्यात १,५०० मिडी इलेक्ट्रिक बसगाड्या! मार्च २०२७ पर्यंत २२५ बस दाखल होणार 
मुंबई

Mumbai : बेस्टच्या ताफ्यात १,५०० मिडी इलेक्ट्रिक बसगाड्या! मार्च २०२७ पर्यंत २२५ बस दाखल होणार

मुंबईकरांना आरामदायी प्रवासासाठी बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात तब्बल १,५०० वातानुकूलित इलेक्ट्रिक मिडी बसगाड्यांचा समावेश करण्यात येणार आहे.

Swapnil S

मुंबई : मुंबईकरांना आरामदायी प्रवासासाठी बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात तब्बल १,५०० वातानुकूलित इलेक्ट्रिक मिडी बसगाड्यांचा समावेश करण्यात येणार आहे. यासाठी गुरुवारी दोन बस पुरवठादार कंपन्यांसोबत करार करण्यात आला.

केंद्र सरकारच्या ‘पीएम ई-ड्राइव्ह’ योजनेंतर्गत या बस भाडेतत्त्वावर चालविण्यात येणार आहेत. मार्च २०२७ पर्यंत पहिल्या टप्प्यात २२५ बस मुंबईच्या रस्त्यांवर धावतील, तर उर्वरित बस मार्च २०२८ पर्यंत टप्प्याटप्प्याने दाखल होतील. एका चार्ज मध्ये २०० किमीचा पल्ला गाठणार आहे. मेट्रो स्थानकांपासून प्रवाशांना घरापर्यंत पोहोचविण्यासाठी या बसचा वापर केला जाणार आहे.

या करारानुसार, मुंबई विद्युत वाहन ऑपरेशन प्रा. लि. कंपनीकडून इका बनावटीच्या १,०५० बस, तर साईग्रीन ईव्हीएम प्रा. लि. कंपनीकडून स्विच बनावटीच्या ४५० बस उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

२८ आसन क्षमता

नऊ मीटर लांबीच्या या बसमध्ये २८ प्रवाशांसाठी आसनव्यवस्था असून दिव्यांगांसाठी स्वतंत्र व्हीलचेअर जागा आणि स्वयंचलित रॅम्प असेल. एका चार्जमध्ये किमान २०० किलोमीटर धावण्याची क्षमता या बसमध्ये आहे. अग्निसुरक्षा यंत्रणा, ३६० अंश प्रत्येक आसनाजवळ यूएसबी चार्जिंगची सुविधाही उपलब्ध असेल.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

UPI वापरणाऱ्या दुकानदारांसाठी खूशखबर! NPCI ने आणली शानदार स्कीम, कसा होणार फायदा? वाचा सविस्तर

एम.एस्सी. नर्सिंग महाविद्यालय ठाण्यात; प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या परिसरात महाविद्यालयाला मान्यता

भाडेकरू फ्लॅट खाली करत नाहीये? आता मनमानी चालणार नाही; मुंबई पोलिसांकडून पहिल्यांदाच घराचा ताबा सोडण्याचे आदेश

Mumbai : नव्या सभागृहाचा मार्ग मोकळा! ३२९ नगरसेवकांसाठी प्रशस्त सभागृह उभारण्यास स्थायीची मंजुरी

ठाणे स्थानकातील सरकते जिने प्रवाशांसाठी गैरसोयीचे; १२ डब्यांच्या लोकलमधील प्रवाशांची फरफट, फलाट ५ आणि ६ वरील नियोजनावर प्रश्नचिन्ह