के. बी. भाभा रुग्णालय, वांद्रे  संग्रहित छायाचित्र
मुंबई

Mumbai : भाभा रुग्णालयात BMC चे पहिले बीएस्सी नर्सिंग कॉलेज

मुंबई पालिकेच्या आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात महत्त्वाची भर पडणार आहे. वांद्रे पश्चिम येथील के. बी. भाभा रुग्णालयाच्या खुल्या जागेवर सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर नवीन नर्सिंग कॉलेज सुरू करण्यात येणार आहे.

Swapnil S

मुंबई : मुंबई पालिकेच्या आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात महत्त्वाची भर पडणार आहे. वांद्रे पश्चिम येथील के. बी. भाभा रुग्णालयाच्या खुल्या जागेवर सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर नवीन नर्सिंग कॉलेज सुरू करण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी वीएसपीएम अकॅडेमी ऑफ हायर एज्युकेशन या संस्थेची निवड करण्यात आली आहे.

संस्थेला ५ कोटी ५६ लाख रुपयांचे एकरकमी अधिमूल्य आणि प्रतिवर्षी अवघ्या २ हजार ३५० रुपये भाडेपट्ट्याने ही जागा सुरुवातीला दहा वर्षांसाठी देण्यात येणार आहे. ३० वर्षांसाठी भाडे पट्ट्याने जागा देण्यात येणार असून १०० विद्यार्थ्यांची क्षमता असणार आहे. हे पालिकेचे पहिले बीएस्सी नर्सिंग कॉलेज ठरणार असल्याचा दावा करण्यात येत आहे.

मुंबई उपनगराचे पालकमंत्र्यांनी ११ सप्टेंबर २०२५ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देऊन के. बी. भाभा रुग्णालयाच्या आवारात नर्सिंग कॉलेज सुरू करण्याची मागणी केली होती.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

महाराष्ट्र कायम अव्वल राहणार; MIDC चे सीईओ दीपेंद्र कुशवाह यांचे प्रतिपादन; एआय, डेटा सेंटर आणि उत्पादनांच्या क्षेत्रात प्रचंड संधी

अंतराळातून परतलेल्या 'स्टारशिप'ला झेलले

मृत्युदंड रद्द करण्यास भारताचा विरोध; संयुक्त राष्ट्रांच्या प्रस्तावाविरोधात मतदान

जीसीसी क्षेत्रात महाराष्ट्राची आगेकूच! तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या हैदराबादला मागे टाकण्याची तयारी

Mumbai : कंपन्यांनी थकवला २३३ कोटी मालमत्ता कर; दहा ते १५ वर्षांपासून BMC ला वसुलीत अपयश