Mumbai : पालिका मुख्यालयातील उपहारगृहाचा गॅससाठा संपला; रोजच्या १५०० लोकांच्या जेवणाचे वांदे  
मुंबई

Mumbai : पालिका मुख्यालयातील उपहारगृहाचा गॅससाठा संपला; रोजच्या १५०० लोकांच्या जेवणाचे वांदे

इराण-इस्रायल युद्धाची झळ आता मुंबई महापालिका मुख्यालयातील उपहारगृहाला बसली आहे. पालिका मुख्यालयातील उपहारगृहात सुमारे १५०० लोकांचे जेवण तयार करण्यासाठी तीन सिलिंडरची गरज भासते. परंतु सिलिंडरच उपलब्ध होत नसल्याने जेवणाचा मोठा प्रश्न निर्माण झाल्याचे उपहारगृह चालकाने सांगितले.

Swapnil S

मुंबई : इराण-इस्रायल यांच्यात युद्ध सुरू झाल्यापासून इंधन पुरवठ्यावर परिणाम होऊ लागला आहे. इराण-इस्रायल युद्धाची झळ आता मुंबई महापालिका मुख्यालयातील उपहारगृहाला बसली आहे. पालिका मुख्यालयातील उपहारगृहात सुमारे १५०० लोकांचे जेवण तयार करण्यासाठी तीन सिलिंडरची गरज भासते. परंतु सिलिंडरच उपलब्ध होत नसल्याने जेवणाचा मोठा प्रश्न निर्माण झाल्याचे उपहारगृह चालकाने सांगितले.

मुंबई महापालिकेच्या कॅन्टीनला इंधन टंचाईची झळ बसली आहे. उपहारगृहातील गॅस सिलिंडरचा साठा संपल्यामुळे उद्यापासून अन्न पदार्थ शिजवण्याचा पेच निर्माण झाला आहे. त्यामुळे पालिका मुख्यालयातील उपहारगृहात अभ्यासगत, पोलीस व पालिका कर्मचारी यांच्यावर उपासमारीची वेळ ओढवली आहे. उपहारगृहाला दररोज मोठ्या आकाराचे तीन सिलिंडर स्वयंपाकासाठी लागतात. सकाळचा नाश्ता, दुपारचे जेवण आणि संध्याकाळचा नाष्टा, अशी तीन पाळ्यांमध्ये खानपान सेवा सुरू असते. बुधवार आणि शुक्रवार या दिवशी शाकाहारी पदार्थांसोबतच नॉनवेज भोजनही उपलब्ध असते.

दिवसभरात सुमारे पंधराशे पेक्षा जास्त लोक येथे पोटपूजा करण्यासाठी येतात. ज्या कर्मचाऱ्यांना कधी काही कारणास्तव डबा आणता येत नाही, त्यांना उपहारगृहाचा आधार असतो.

इलेक्ट्रिक शेगडीचा वापर करणार

गुरुवारपासून कॅन्टीनमध्ये अन्नपदार्थ तयार होतील की नाही, याची शंका आहे. बुधवारीच गॅस सिलिंडरचा साठा संपलेला आहे. मागणी करुनही अद्याप सिलिंडर उपलब्ध झालेला नाही, अशी माहिती कॅन्टीन व्यवस्थापनातील एका सदस्याने दिली. त्यामुळे गुरुवारपासून इलेक्ट्रिक शेगडीवर वेळ मारून न्यावी लागणार आहे. मात्र इलेक्ट्रिक शेगडीवर मोठ्या प्रमाणावर अन्नपदार्थ तयार करता येत नाही. काही मर्यादा येतात, असेही त्यांनी सांगितले.

Mumbai : 'मिसिंग लिंक' प्रकल्पाचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन; मुंबई-पुणे प्रवासाचा वेळ होणार कमी

टीएमटीच्या ताफ्यात पहिली डबलडेकर ई-बस दाखल

Pune : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; खंडाळा घाटात वाहनांच्या रांगा, खासदार सुप्रिया सुळेही दोन तास अडकल्या, VIDEO

Navi Mumbai : डीपीशेजारी कचरा टाकू नका, गाड्या पार्क करू नका; महावितरणचे आवाहन

मानखुर्दमध्ये क्रेन दुर्घटना : कंत्राटदाराला एक कोटींचा दंड