मुंबई

Mumbai : मालमत्ता कराचा भरणा ४ ते १० ऑक्टोबरदरम्यान बंद; काय आहे कारण?

४ ऑक्टोबरच्या मध्यरात्री १२ वाजल्यापासून १० ऑक्टोबरच्या मध्यरात्री १२ वाजेपर्यंत करनिर्धारण प्रक्रिया व मालमत्ता कर संकलन सुविधा बंद राहणार आहे.

Swapnil S

मुंबई : मुंबई महापालिकेने भांडवली मूल्य आधारित करप्रणालीच्या सर्व्हरवरील माहिती क्लाऊड सर्व्हरवर स्थानांतरित करण्याचे काम हाती घेतले आहे. त्यामुळे ४ ऑक्टोबरच्या मध्यरात्री १२ वाजल्यापासून १० ऑक्टोबरच्या मध्यरात्री १२ वाजेपर्यंत करनिर्धारण प्रक्रिया व मालमत्ता कर संकलन सुविधा बंद राहणार आहे.

महानगरपालिका मुख्यालयासह सर्व २४ प्रशासकीय विभागांतील नागरी सुविधा केंद्रांमधील करभरणा, ऑनलाईन कर भरणा बंद राहणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. या सात दिवसांत महानगरपालिका संकेतस्थळावरील मालमत्ताकराशी संबंधित कोणतीही माहिती उपलब्ध नसेल. करदात्यांनी व मुंबईकर नागरिकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाच्यावतीने करण्यात येत आहे.

महानगरपालिकेच्या करनिर्धारण व संकलन विभागामार्फत मालमत्तांचे करनिर्धारण व संकलन केले जाते. त्यासाठी महानगरपालिका मुख्यालयासह सर्व २४ प्रशासकीय विभागांमध्ये नागरी सुविधा केंद्राच्या माध्यमातून करसंकलन सुविधा उपलब्ध आहे. या ठिकाणी रोख रकमेसह धनादेश, धनाकर्ष (डी.डी) स्वीकारले जातात. सरलेल्या आर्थिक वर्ष २०२३ - २४ मध्ये करनिर्धारण व संकलन विभागाने ४ हजार ८५६ कोटी रुपयांचा विक्रमी महसूल संकलित केला. त्यात ऑनलाईन करभरण्याचादेखील समावेश होता. तथापि, तांत्रिक कारणांमुळे सध्या अस्तित्वात असलेल्या सर्व्हरची क्षमता अपुरी पडत असल्या कारणास्तव मनपा प्रशासनाने 'क्लाऊड' सेवेचा अवलंब करण्याचा निर्णय घेतला आहे. अस्तित्वातील सर्व्हरमधील माहिती क्लाऊड सर्व्हरवर स्थानांतरित करण्याचे कामकाज हाती घेण्यात येणार आहे.

अदानी पुन्हा गोत्यात; सौरऊर्जा कंत्राट मिळविण्यासाठी दिली 2000 कोटींची लाच, अमेरिकेतील कोर्टात आरोप

मुख्यमंत्रीपदावरून रणकंदन! महायुतीत फडणवीस, शिंदे, अजित पवारांच्या नावाचे दावे

अपक्ष, बंडखोरांवर सत्ता स्थापनेची मदार; महायुती व मविआची जोरदार मोर्चेबांधणी

रशियाचा युक्रेनवर आंतरखंडीय क्षेपणास्त्राने हल्ला

कोल्हापूरच्या चेतन पाटीलला जामीन मंजूर; जयदीप आपटेच्या जामिनावर सोमवारी सुनावणी