मुंबई : मुंबई शहरातील राज्य सरकारच्या विविध शासकीय कार्यालयाने मुंबई महापालिका प्रशासनाचा सुमारे १८०० कोटी ३३ लाख रुपयांचा मालमत्ता कर थकविला आहे. यामुळे महापालिकेच्या महसुलांवर परिणाम होत असून तो भरण्याकडे सरकारी यंत्रणा दुर्लक्ष करत असल्याचे पालिका सूत्रांनी सांगितले.
जकात बंद झाल्यावर मुंबई महापालिकेच्या महसुलाचा मुख्य स्रोत मालमत्ता कर राहिला आहे. परंतु अनेक शासकीय यंत्रणा हा कर भरण्यासाठी उदासीनता दाखवत आहेत. नुकतीच करनिर्धारण विभागाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार एमएमआरडीएने ९२९ कोटी ७९ लाख ७६ हजार ८५२ रुपये, म्हाडा प्रशासनाने ३६८ कोटी ५५ लाख ८९ हजार ९६७ रुपये, मुंबई पोलीस विभाग ७१ कोटी ४३ लाख ४२ हजार ६६२ रुपये, राज्य सरकारी कार्यालये २२१ कोटी ८५ लाख ७८ हजार ०१७ रुपये, तर केंद्र सरकारची कार्यालये २०८ कोटी ६८ लाख ७६ हजार ६०२ रुपये अशाप्रकारे या सर्व शासकीय कार्यालयांनी महापालिका मालमत्ता कर थकविलेला आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेचे हजारो कोटींचे नुकसान होत आहे.
कोणाकडे किती थकबाकी?