पात्र फेरीवाल्यांना देणार 'क्यूआर कोड' आधारित प्रमाणपत्र; मुंबईत १५ हजार पात्र फेरीवाले, पालिका आयुक्त भूषण गगराणी यांची माहिती  
मुंबई

पात्र फेरीवाल्यांना देणार 'क्यूआर कोड' आधारित प्रमाणपत्र; मुंबईत १५ हजार पात्र फेरीवाले, पालिका आयुक्त भूषण गगराणी यांची माहिती

मुंबईतील पदपथ ‘‘फेरीवालेमुक्त’ करण्यासाठी मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी ही विशेष मोहीम हाती घेतली आहे. यात विशेषत: बांगलादेशी फेरीवाले रडारवर आले आहेत. तर दुसरीकडे मुंबई महापालिकेनेही मुंबईचे फुटपाथ ‘फेरीवालामुक्त’ करण्यासाठी पात्र फेरीवाल्यांना ‘क्यूआर कोड’आधारित प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतला आहे.

Swapnil S

मुंबई : मुंबईतील बेकायदा फेरीवाल्यांविरोधात पालिकेने कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली आहे. मुंबईचे फुटपाथ मुंबईकरांना चालण्यासाठी असून यापुढे अधिकृत फेरीवाल्यांना ‘क्यूआर कोड’आधारित प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत. मुंबईत १५ हजार अधिकृत फेरीवाले असून राज्य सरकारच्या नियमानुसार फेरीवाल्यांना अधिवास प्रमाणपत्र (डोमिसाईल) सादर करणे बंधनकारक आहे, असे पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी सांगितले. मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर पालिका आयुक्तांनी पत्रकार परिषद घेतली, त्यावेळी ते बोलत होते.

मुंबईतील पदपथ ‘‘फेरीवालेमुक्त’ करण्यासाठी मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी ही विशेष मोहीम हाती घेतली आहे. यात विशेषत: बांगलादेशी फेरीवाले रडारवर आले आहेत. तर दुसरीकडे मुंबई महापालिकेनेही मुंबईचे फुटपाथ ‘फेरीवालामुक्त’ करण्यासाठी पात्र फेरीवाल्यांना ‘क्यूआर कोड’आधारित प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबईत एकूण १ लाख फेरीवाले

मुंबईत १ लाख फेरीवाले असल्याचे समोर आले आहे. त्यानंतर मुंबईतील फेरीवाल्यांचे सर्वेक्षण करण्यात आले होते. या सर्वेक्षणात १५ हजार पात्र फेरीवाले असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पात्र फेरीवाल्यांना ‘क्यूआर कोड’आधारित प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतल्याचे भूषण गगराणी यांनी सांगितले.

रस्त्याच्या कामावरून प्रश्न विचारताच तरुणाच्या लगावली कानशिलात; मंत्री प्रवेश वर्मांचा Video सोशल मीडियावर व्हायरल

NCMC Card : अजून कार्ड काढलं नाही? १ ऑक्टोबरपूर्वी करा नोंदणी; कुठे अन् कशी करायची? वाचा संपूर्ण प्रक्रिया

Video : आशुतोष रांकांसह CJP चे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात; सुटका न झाल्यास आसामला जाणार, अभिजीत दिपकेंचा इशारा

Mumbai : अनंत चतुर्दशीला नाही तर अंगारकी संकष्टीला होते अंधेरीच्या राजाचे विसर्जन; जाणून घ्या खास परंपरा

LPU Students Protest : बलात्काराच्या अफवेने विद्यार्थ्यांचा उद्रेक; कॅम्पसमध्ये जाळपोळ, महामार्गही रोखला, Video