मुंबई

शिवसेना भवनाजवळ बर्निंग कारचा थरार; बघ्यांची गर्दी, वाहतुकीचा खोळंबा

प्रतिनिधी

आज दुपारी दादरच्या शिवसेना भवनाबाहेर एका चारचाकीने अचानक पेट घेतला. ही आग इतकी भयानक होती की संपूर्ण गाडी यामध्ये जाळून खाक झाली. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या या गाडीने पेट घेतल्यानंतर स्थानिक नागरिक, तसेच भवनातील कर्मचाऱ्यांनी ही आग विझविण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, यामुळे बघ्यांची मोठी गर्दी जमा झाली आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूची वाहतूक बराचवेळ थांबवण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, आग लागलेली गाडी ही खासगी टॅक्सी होती. ती कोणाच्या मालकीची आहे? याचा शुद्ध सुरु असून रस्त्याच्या कडेला असलेल्या या गाडीने अचानक पेट कसा घेतला? याचीदेखील चौकशी पोलिसांकडून करण्यात येत असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, ही गाडी शिवसेना भवनासमोर उभी करण्यात आली होती. गाडीने पेट घेताच तिथे उभे असलेल्या सुरक्षारक्षांनी स्थानिक नागरिकांच्या सोबतीने ही आग विझविण्याचा प्रयत्न केला. अखेर काही काळानंतर ही आग आटोक्यात आली. त्यानंतर अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी पोहचली. त्यांच्याकडून कुलिंग ऑप्रेशन करण्यात आले. विशेष म्हणजे, शिवसेना भवन ही मुंबईतील महत्ताच्या इमारतींपैकी एका आहे. त्यामुळे पोलिसांकडूनही या घटनेची चौकशी होणार असल्याचे सांगितले जात आहे.

टी-२० विश्वचषकावर दहशतवादी हल्ल्याचे सावट

पोलिस शिपाई विशाल पवारांना होतं दारूचं व्यसन; माटुंग्यातील बारमध्ये विकली होती अंगठी ...पोलीस तपासात काय आलं समोर?

भारताच्या दोन्ही रिले संघांना पॅरिस ऑलिम्पिकचे तिकीट!

"अजितदादा तुम्ही माझी ॲक्टिंग केल्याचं समजलं, पण...", रोहित पवारांचा रडण्याच्या नक्कलेवरून अजित पवारांना टोला

"मी जोरात ओरडले, माझ्या मदतीसाठी कोणीही...", राधिका खेरा यांनी गैरवर्तनाप्रकरणी काँग्रेसवर केले गंभीर आरोप