(संग्रहित छायाचित्र) 
मुंबई

कोस्टल रोडची संपूर्ण सफर २०२५ मध्येच, कंत्राटदाराला हवी १८१ दिवसांची मुदतवाढ; RTI मधून खुलासा

मुंबईसाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या कोस्टल रोडची संपूर्ण सफर २०२५ मध्ये घडणार आहे. कोस्टल रोडचे संपूर्ण काम पूर्ण करण्यास एलअँडटी कंपनीने आणखी १८१ दिवसांची मुदतवाढ मागितली आहे, असे माहिती अधिकारातून समोर आले आहे.

Swapnil S

मुंबई : मुंबईसाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या कोस्टल रोडची संपूर्ण सफर २०२५ मध्ये घडणार आहे. कोस्टल रोडचे संपूर्ण काम पूर्ण करण्यास एलअँडटी कंपनीने आणखी १८१ दिवसांची मुदतवाढ मागितली आहे, असे माहिती अधिकारातून समोर आले आहे.

ऑक्टोबर २०१८ मध्ये कोस्टल रोड प्रकल्पाचा शुभारंभ झाला. आतापर्यंत कोस्टल रोड प्रकल्पाचे ९१ टक्के काम पूर्ण झाले असून वरळी ते मरिन ड्राइव्ह आणि मरिन ड्राइव्ह ते वरळी बिंदू माधव चौकापर्यंत लेन वाहतुकीसाठी खुली करण्यात आली आहे.

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुंबई महानगरपालिकेकडे किनारा रस्ता प्रकल्पांतर्गत, हा प्रकल्प पूर्ण करण्याची मूळ तारीख आणि सद्यस्थितीची माहिती मागितली होती. “भाग-४ चे काम पूर्ण करण्याची मूळ तारीख १२ ऑक्टोबर २०२२ होती. या कामास २५ मे २०२३ आणि २६ नोव्हेंबर २०२३ तसेच २ एप्रिल २०२४ अशी तीन वेळा मुदतवाढ देण्यात आली आहे. लार्सन अँड टुर्बोतर्फे २३ जुलै २०२४ रोजी लेखी पत्र पाठवून ८ कारणासाठी १८१ दिवसांची मुदतवाढ मागितली आहे,” असे गलगली यांना कळवण्यात आले आहे.

यापूर्वी भाग एकचे काम पूर्ण करण्याची मूळ तारीख १२ ऑक्टोबर २०२२ होती. या कामास ९ जून २०२३ १० सप्टेंबर २०२३ आणि २२ मे २०२५ अशी तीन वेळा मुदतवाढ देण्यात आली आहे. भाग दोनचे काम पूर्ण करण्याची मूळ तारीख १५ ऑक्टोबर २०२२ होती.

...तरच उद्घाटन

अनिल गलगली यांच्या मते, २०२५ पर्यंत काम पूर्ण होणार नाही. जोपर्यंत हा प्रकल्प १०० टक्के पूर्ण होत नाही, तोपर्यंत राज्य सरकारने निवडणूक लक्षात घेता, घाईगडबडीत कामाचे उद्घाटन करू नये.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी