मुंबईतील २९ बांधकामांना काम बंद नोटीस; प्रदूषण केल्याने मुंबई मनपाची कारवाई 
मुंबई

मुंबईतील २९ बांधकामांना काम बंद नोटीस; प्रदूषण केल्याने मुंबई मनपाची कारवाई

मुंबई प्रदूषण मुक्त करण्यासाठी मुंबई महापालिका प्रयत्नशील आहे. मात्र बांधकाम ठिकाणी धुळीचे कण पसरत असल्याने हवेतील गुणवत्ता खालावत आहे. अखेर प्रदूषण मुक्त मुंबईसाठी मुंबई महापालिकेने १ ते २२ ऑक्टोबर दरम्यान २९ बांधकामांना काम बंदची नोटीस बजावली असून २७० बांधकामांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

Swapnil S

मुंबई : मुंबई प्रदूषण मुक्त करण्यासाठी मुंबई महापालिका प्रयत्नशील आहे. मात्र बांधकाम ठिकाणी धुळीचे कण पसरत असल्याने हवेतील गुणवत्ता खालावत आहे. अखेर प्रदूषण मुक्त मुंबईसाठी मुंबई महापालिकेने १ ते २२ ऑक्टोबर दरम्यान २९ बांधकामांना काम बंदची नोटीस बजावली असून २७० बांधकामांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

मुंबईच्या हवेतील गुणवत्ता खालावली असून प्रदूषणात वाढ झाली आहे. यामुळे मुंबईकरांच्या आरोग्यावर परिणाम होण्याचा धोका अधिक आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने सुधारण्यासह प्रदूषण रोखण्यासाठी बांधकाम ठिकाणी नियमावली जारी केली आहे. मात्र बांधकाम ठिकाणी काळजी न घेतल्याने हवेचे प्रदूषण वाढत आहे. पालिकेच्या मार्गदर्शक सुचनेनुसार हवेच्या गुणवत्तेवर होणारा परिणाम कमी करण्यासाठी आवश्यक असलेल्या अनेक उपाययोजनांचा करणे बंधनकारक केले आहे.

बांधकाम ठिकाणी स्प्रिंकलर उभारणे, ३५ फुट उंच पडदे लावणे, बांधकाम ठिकाणी हवेची गुणवत्ता तपासणीसाठी सेन्सर्स बसवणे आदी २८ नियम बंधनकारक केले आहे. मात्र अनेक बांधकाम ठिकाणी नियमांचे पालन होत नसल्याचे निदर्शनास आल्याने आधी कारणे दाखवा नोटीस नंतर ही सुधारणा न केल्यास काम बंदची नोटीस बजावण्यात येते, असे पालिकेच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाकडून सांगण्यात आले.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : पुनर्विकासात उशीर केल्यामुळे गृहनिर्माण संस्थेला ६.२० कोटींची भरपाई

कॅनरा बँकेची २१२.३४ कोटींची फसवणूक; CBI चे छापे

Mumbai : बेस्ट बसमध्ये न घेतल्यास कोयता हाती घेऊ! मच्छिमार महिला संतप्त

Mumbai 'एसआयआर'मध्ये गोलमाल; एकाच व्यक्तीकडून एकाच दिवशी २४ अर्ज, धारावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

वनडे मालिका जिंकण्यासाठी भारतीय महिला सज्ज; झिम्बाब्वेविरुद्धचा दुसरा एकदिवसीय सामना आज