Mumbai : सीएसएमटी स्थानकात आंदोलन करणाऱ्यांवर गुन्हा 
मुंबई

Mumbai : सीएसएमटी स्थानकात आंदोलन करणाऱ्यांवर गुन्हा

मुंब्रा दुर्घटनेला जबाबदार असलेल्या दोन अभियंत्यांवर दाखल केलेला गुन्हा मागे घ्यावा यासाठी सेंट्रल रेल्वे मजदूर संघाच्या कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे गेल्या आठवड्यात आंदोलन केले. यामुळे लोकल सेवा तब्बल एक तास विस्कळीत झाली. या प्रकरणी सीएसएमटी पोलिसांनी रात्री आंदोलकांवर गुन्हा दाखल केला.

Swapnil S

मुंबई : मुंब्रा दुर्घटनेला जबाबदार असलेल्या दोन अभियंत्यांवर दाखल केलेला गुन्हा मागे घ्यावा यासाठी सेंट्रल रेल्वे मजदूर संघाच्या (सीआरएमएस) कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथे गेल्या आठवड्यात आंदोलन केले. यामुळे लोकल सेवा तब्बल एक तास विस्कळीत झाली. या प्रकरणी सीएसएमटी पोलिसांनी रात्री आंदोलकांवर गुन्हा दाखल केला.

जून महिन्यात मुंब्रा येथे झालेल्या दुर्घटनेत पाच प्रवाशांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी मध्य रेल्वेचे वरिष्ठ विभागीय अभियंता समर यादव आणि सहाय्यक विभागीय अभियंता विशाल डोळस यांच्याविरोधात ठाणे रेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हे गुन्हे मागे घेण्यासाठी सेंट्रल रेल्वे मजदूर संघाने गुरुवारी सीएसएमटी स्थानकात आंदोलन केले. यामुळे सुमारे एक तास लोकल सेवा ठप्प झाली होती.

संघटनेला डीआरएम कार्यालयासमोर आंदोलन करण्यास परवानगी असताना सीआरएमएसचे पदाधिकारी व सदस्य जमाव मिलन हॉल येथे जमा झाले. जमावामध्ये सीआरएमएस संघटनेचे प्रमुख प्रविण वाजपेयी व त्यांच्या सोबत इतर १०० ते २०० आंदोलक हे सामील होते. आंदोलक डीआरएम कार्यालयासमोर गेले व तेथे रेल्वे पोलीस ठाणे, लोहमार्ग मुंबई यांच्याकडून करण्यात आलेल्या कायदेशीर कारवाईचा निषेध करून घोषणाबाजी केली. आंदोलन समाप्त झाल्यानंतर सीआरएमएस संघटनेचे सदस्य एस. के. दुबे आणि विवेक शिसोदीया व त्यांच्यासोबत इतर ३० ते ४० आंदोलक हे सीएसएमटी लोकल लाईन जनरल हॉल येथील मोटरमन लॉबी येथे आले.

Mumbai: कर्जत-कसारा मार्गावरील प्रवाशांना लवकरच दिलासा; १५ डब्यांच्या लोकलबाबत खूशखबर

Mumbai : मोदींच्या उपस्थितीत NESCO मधील इव्हेंटदरम्यान टॉयलेटमध्ये बेशुद्ध पडले होते माजी ऑस्ट्रेलियन मंत्री; तातडीच्या मदतीने वाचला जीव

तरुणांच्या विवाह योगात बिबट्यांचे विघ्न; दहशतीमुळे पुणे जिल्ह्यात विवाहेच्छुक तरुणांना मुली मिळेनात

‘४२ कोटींची वसुली नोटीस कशासाठी?’ मुंढवा जमीन प्रकरणात महसूलमंत्र्यांचे आश्चर्य; दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईचे निर्देश

Mumbai : नॅशनल पार्कमधील अतिक्रमित नागरिकांच्या पुनर्वसनासाठी जागा शोधा; उच्च न्यायालयाचे आदेश