मुंबईतील प्रत्येक वाहनांची कसून तपासणी करा; अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांचे निर्देश 
मुंबई

मुंबईतील प्रत्येक वाहनांची कसून तपासणी करा; अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांचे निर्देश

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे. निवडणूक कालावधीत मुंबईतील प्रत्येक वाहनांची कसून तपासणी करा, असे निर्देश मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त जोशी यांनी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिले आहेत.

Swapnil S

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे. निवडणूक कालावधीत मुंबईतील प्रत्येक वाहनांची कसून तपासणी करा, असे निर्देश मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त जोशी यांनी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिले आहेत.

मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठीची संपूर्ण निवडणूक प्रक्रिया सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी अत्यंत दक्षतेने आणि सतर्कतेने पार पाडावी. पारदर्शक निवडणुकीसाठी नेमलेल्या सर्व समित्यांनी तत्पर राहून कार्य करावे. संपूर्ण मुंबई महानगरात नेमलेल्या स्थिर निगराणी पथकातील कर्मचाऱ्यांनी येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांची कसून तपासणी करावी. तसेच, ‘आपले मतदान केंद्र जाणून घ्या’ अभियान प्रभावीपणे राबवून मतदारांपर्यंत माहिती पोहोचवण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत. मुंबई मनपाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने शनिवारी आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या. विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, राबविण्यात आलेल्या ‘आपले मतदान केंद्र जाणून घ्या’ अभियानाची निवडणुकीतही प्रभावीपणे अंमलबजावणी करावी. घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या या अभियानाच्या माध्यमातून प्रत्येक मतदारांपर्यंत त्यांच्या मतदान केंद्रांची माहिती पोहोचेल, हे सुनिश्चित करावे, असे निर्देशही डॉ. अश्विनी जोशी यांनी दिले. यावेळी सहआयुक्त विश्वास शंकरवार, विविध परिमंडळांचे उपायुक्त, कोकण विभागाच्या अपर आयुक्त फरोग मुकादम, गजानन बेल्लाळे उपस्थित होते.

पथकांनी दक्षतेने काम करावे!

प्रत्येक मतदान केंद्रांवर किमान निश्चित सुविधांची लवकरात लवकर पूर्तता करावी. मतमोजणी केंद्रांचा सुनियोजित आराखडा तयार करावा. निवडणुकीच्या सर्व प्रक्रियेत प्रशासनाने तत्पर राहावे तसेच विविध पथकांनी अत्यंत सक्रियपणे आणि दक्षतेने कार्यवाही करावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

"व्हिडीओ पाहायला आमच्याकडे वेळ नाही"; CJP आंदोलकांच्या याचिकेवर सरन्यायाधीश सूर्य कांत यांचे भाष्य, तातडीच्या सुनावणीस नकार

आता AI ठेवणार पक्ष्यांवर नजर! महाराष्ट्रात उभारलं जाणार देशातील पहिलं AI-आधारित पक्षी अभयारण्य

Mumbai Rains : पावसात अडकलेल्या मुंबईकरांना 'Vi'चा दिलासा! स्टोअरमध्ये घेता येणार आश्रय, मोबाईल चार्जिंगचीही सोय

१८ वर्षीय तरुणाने घातला ६५ कोटींचा गंडा! AI च्या मदतीने बनवले १२१ बनावट अ‍ॅप्स

Mumbai Rain Alert : मुंबईत मुसळधार पावसासह भरतीचाही धोका; वादळी वाऱ्याचा इशारा, नागरिकांना सतर्कतेचे आवाहन