मुंबई

घरांच्या किमती वाढल्याची राज्य सरकारची कबुली

सरकारकडून तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांकडून लादल्या जाणाऱ्या करांमुळे घरांच्या किमतीत वाढ झाल्याची कबुली पहिल्यांदाच राज्य सरकारने दिली. याच कारणांमुळे मुंबईसह अन्य शहरांमधील फ्लॅटच्या किंमतीत वाढ झाल्याची माहिती उपमुख्यमंत्री तथा नगरविकास खात्याचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात दिली.

Swapnil S

मुंबई : सरकारकडून तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांकडून लादल्या जाणाऱ्या करांमुळे घरांच्या किमतीत वाढ झाल्याची कबुली पहिल्यांदाच राज्य सरकारने दिली. याच कारणांमुळे मुंबईसह अन्य शहरांमधील फ्लॅटच्या किंमतीत वाढ झाल्याची माहिती उपमुख्यमंत्री तथा नगरविकास खात्याचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात दिली.

मुंबईतील घरांच्या किंमती आणि बांधकाम खर्च यात ३० टक्क्यांची तफावत असून बिल्डरची घसघशीत कमाई होते, असे यासंबंधीच्या प्रश्नाला उत्तर देताना एकनाथ शिंदे यांनी सांगितले. एकनाथ शिंदे म्हणाले की, “अलिकडच्या काळात सिमेंट, स्टील, विटा, वाळू आणि इतर साहित्याच्या किंमती वाढल्या आहेत. याशिवाय, वस्तू आणि सेवा कर (जीएसटी), बांधकाम कामगारांच्या कल्याणासाठी आकारण्यात येणारा उपकर, विविध कारणांसाठी आकारण्यात येणारी रॉयल्टी, विमा आणि स्थानिक नागरी संस्थांकडून आकारण्यात येणारा प्रीमियम वाढल्याने मुंबई आणि राज्यातील इतर शहरांमध्ये फ्लॅटच्या किंमती सतत वाढत आहेत.” सरकारी कर आणि अन्य शुल्क तसेच मुंबई महापालिकेकडून आकारला जाणारा कर मुंबईतील फ्लॅटच्या किंमती वाढण्यास कारणीभूत आहेत, याची एकप्रकारे कबुलीच शिंदेंनी दिली.

विधान परिषदेचे आमदार सतेज पाटील, अशोक उर्फ भाई जगताप, अभिजीत वंजारी आणि १३ अन्य सदस्यांनी यांनी हा प्रश्न विचारला होता. मुंबईतील घरांच्या किंमती नियंत्रित करण्यासाठी एक यंत्रणा तयार करावी तसेच रेडी रेकनरचे (आरआर) दर वाढवण्याचा राज्याचा निर्णय मुंबई आणि इतर भागात किंमती वाढण्यास कारणीभूत ठरत आहे का, असा प्रश्न त्यांनी विचारला होता. त्यावर उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, “मुंबईत २०२२-२३नंतर पहिल्यांदाच रेडी रेकनरचे दर वाढवण्यात आले असून मुंबईसाठी तो ४.३९ टक्के इतका आहे. खुल्या बाजारातील दरांपेक्षा हे दर कितीतरी पटींनी कमी आहेत. रेडी रेकनरचे दर हे खुल्या बाजारातील किंमतीच्या आधारे निश्चित केले जातात.”

मुंबईसह राज्यातील कबुतरखाने बंद होणार; उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती

बाळ चोरीला गेल्यास रुग्णालयाची नोंदणी रद्द होणार; राज्य सरकारचा निर्णय

मुंबई, दिल्ली मेट्रो शहरांचा झगमगाट आता संधीच्या नकाशावर मागे! आता Freshers साठी चेन्नई ठरतंय पगाराचा नवा 'हॉटस्पॉट'

आता २४ तास वाळू वाहतूक; GPS, CCTV बसवणे बंधनकारक; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सभागृहात घोषणा

सरकारी यंत्रणा शेतकऱ्यांची मारेकरी! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राहुल गांधी आक्रमक