मुंबई

Mumbai : पुण्यानंतर मुंबईतही सकल हिंदू समाजाचा मोर्चा; लव्ह जिहाद, धर्मांतरविरोधी कायदा लागू करण्याची मागणी

प्रतिनिधी

पुण्यानंतर मुंबईमध्ये (Mumbai) आज हिंदू (hindu) सकल समाजाकडून हिंदू जण आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. शिवाजी पार्कमधून या मोर्चाची सुरुवात झाली. शिंदे गट आणि भाजपसह अनेक हिंदुत्ववादी संघटना या मोर्चामध्ये सहभागी झाल्या आहेत. यावेळी लव्ह जिहाद आणि धर्मांतर विरोधी कायदा लागू करण्याच्या प्रमुख मागण्या करण्यात आल्या. या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. विशेष म्हणजे महिला या मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन मोर्चाचे नेतृत्व करत आहे.

महाराष्ट्रासह देशभरात लव्ह जिहाद आणि धर्मांतर विरोधी कायदा लागू व्हावा, यासाठी सकल हिंदू समाजाकडून हा मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चामध्ये लव्ह जिहाद प्रकरणात अडकलेल्या मुलींचे कुटुंब, आणि ज्यांची या प्रकरणामध्ये फसवणूक झाली अशा काही पीडित महिलांचाही या मोर्चात सहभाग होता. यावेळी, या मोर्चाचे नेतृत्व महिला करत होत्या. यामध्ये महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली होती. "जो हिंदू हित का काम करेगा, वही देश पे राज करेगा, गर्व से कहो हम हिंदू है" , अशा प्रकारच्या घोषणा यावेळी देण्यात आल्या. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांना मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.

भर सभेत रडले रोहित पवार...सुप्रिया सुळेंच्या प्रचारसभेत नेमकं काय घडलं?

बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना जमावानं जीव जाईपर्यंत मारलं, नेमका कुठं घडला प्रकार?

कांदा निर्यातबंदी उठवली! ४० टक्के निर्यातकरामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष कायम

थांबा... पुढे धोका, आज समुद्र खवळणार; हवामान विभागाचा 'अलर्ट'; समुद्रात जाणे टाळा, पालिकेचे आवाहन

भारतीय नौदल बांधणार ‘एआयपी’ तंत्रज्ञानाने पाणबुड्या; ६० हजार कोटींचा प्रकल्प!