Mumbai : कमला मिलमधील दोन मालमत्ता जप्त; BMCकडून कठोर कारवाई 
मुंबई

Mumbai : कमला मिलमधील दोन मालमत्ता जप्त; BMCकडून कठोर कारवाई

मालमत्ता कर ३१ मार्च पूर्वी न भरणाऱ्याविरोधात मुंबई महापालिकेने कडक कारवाईला सुरुवात केली आहे.

Swapnil S

मुंबई : मालमत्ता कर ३१ मार्च पूर्वी न भरणाऱ्याविरोधात मुंबई महापालिकेने कडक कारवाईला सुरुवात केली आहे. पालिकेच्या कर निर्धारण व संकलन विभाग तसेच जी/दक्षिण विभागाच्या वतीने कमला मिल परिसरातील रमेश घमंडीराम गोवानी व मेसर्स गौरव इन्व्हेस्टमेंट यांच्या मालकीच्या सात गाळ्यांसह कार्यालय, वाहनतळ, इंटरनेट सेंटर, टाटा पॉवर उप केंद्रावर गुरुवारी जप्तीची कारवाई करण्यात आली. तसेच संबंधित मालमत्तांचा पाणीपुरवठाही खंडित करण्यात आला आहे.

अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांचे मार्गदर्शन आणि सहआयुक्त (कर निर्धारण व संकलन) विश्वास शंकरवार, सहाय्यक आयुक्त (कर निर्धारण व संकलन) गजानन बेल्लाळे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली आहे.

सन २०२५-२६ या आर्थिक वर्षाचा तसेच थकीत मालमत्ता कर ३१ मार्चपूर्वी न जमा केल्यास संबंधित मालमत्ताधारकांविरोधात दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे तसेच थकीत करभरणा न करणाऱ्या मालमत्तांवर अटकावणी आणि जप्तीची कारवाई मुंबई महापालिकेकडून करण्यात येत आहे.

वाहनतळ, गाळे, कार्यालय जप्त

कमला मिल परिसरातील रमेश घमंडीराम गोवानी व मेसर्स गौरव इन्व्हेस्टमेंट यांच्याकडे मालमत्ता करापोटी १४ कोटी २२ लाख रुपयांची थकबाकी आहे, तसेच ६७ लाख २५ हजार ७३१ रुपयांचीदेखील थकबाकी आहे. विहित मुदतीत मालमत्ता कर भरणा न केल्यामुळे टाटा पॉवर उपकेंद्र, इंटरनेट सेंटर, मोकळे वाहनतळासह सात गाळे आणि गोवानी यांच्या मालकीच्या कार्यालयावर जप्तीची कारवाई करण्यात आली.

हाॅटेल सहारा स्टारचा पाणीपुरवठा खंडित

विलेपार्ले येथील सहारा स्टार हॉटेलवर मोठी कारवाई करत त्यांचा पाणीपुरवठा खंडित केला आहे. हॉटेल व्यवस्थापनाकडे सुमारे ४१ कोटी रुपयांचा मालमत्ता कर थकबाकी असल्याचे समोर आले आहे. सहारा स्टार हॉटेलकडून गेल्या अनेक वर्षांपासून मालमत्ता कर भरला गेलेला नव्हता. पालिकेने वारंवार नोटिसा देऊनही हॉटेल व्यवस्थापनाने रक्कम भरली नाही. अखेर शुक्रवारी हॉटेलचा पाणीपुरवठा खंडित केला.

कोकणचा काजू आता ‘जागतिक ब्रँड’ होणार; ४० कोटींच्या प्रकल्पाला मंजुरी

Mumbai : "लक्ष द्या जरा साहेब!" ; बोरिवली स्थानकावरील पादचारी पुलाला तडे? व्हायरल व्हिडिओमुळे प्रवाशांमध्ये चिंता

परिवहन मंत्र्यांच्या ठाण्यातील ST डेपो दुर्लक्षित; १५ दिवसांत सुधारणा न झाल्यास आंदोलन, शिवसेना उबाठा आक्रमक

Mumbai : वारसा हक्काच्या प्रलंबित प्रकरणांचा अहवाल द्या; राज्य सफाई कर्मचारी आयोगाच्या उपाध्यक्षांचे निर्देश

साताऱ्यातील कण्हेर धरणावरील हेल्पर ते केनियातील कृषी सम्राट; कष्ट आणि जागतिक यशाची भावस्पर्शी प्रेरणागाथा