मुंबई

हुतात्मा चौक ते मरीन लाइन्सचा कायापालट होणार

खासदार श्रीकांत शिंदे यांच्या सूचनेची मुंबई महापालिका अंमलबजावणी करणार

प्रतिनिधी

मुंबई पर्यटकांचे आकर्षण असून, हुतात्मा चौक मरीन लाइन्स परिसरात सायकल ट्रॅक, पर्यटकांसाठी बसण्यासाठी आसन व्यवस्था करण्यात यावी, अशी सूचना शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांनी मुंबई महापालिका आयुक्त व प्रशासक डॉ इकबाल सिंग चहल यांना केली आहे. दरम्यान, शिंदे यांनी केलेल्या सूचनांची अंमलबजावणी लवकरच करण्यात येईल, असे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

मुंबईच्या समृद्ध वारशाचा प्रसार करण्यासाठी आणि पर्यटकांसाठीच्या सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी फोर्ट विभाग आणि मरीन ड्राइव्हच्या सुधारणेवर खासदार श्रीकांत शिंदे यांनी दोन दिवसांपूर्वी आयुक्तांची भेट घेत काही सूचना केल्याचे श्रीकांत शिंदे यांनी सांगितले.

अल्पकालीन आणि दीर्घकालीन उपाययोजनांद्वारे फोर्ट आणि मरीन ड्राइव्हच्या प्रस्तावित आराखड्यावर अधिका-यांनी यावेळी सविस्तर सादरीकरण केले. या प्रस्तावित योजनेत विविध वयोगटांसाठी मोकळ्या सार्वजनिक जागा सुधारण्यासाठी तसेच मरीन ड्राईव्हवर सायकल ट्रॅक, मुंबईतील नागरिकांसाठी शौचालयांची उपलब्धता, बसण्यासाठी बेंच आणि माहितीपूर्ण चिन्हांचा फलक लावावेत, अशा सूचना शिंदे यांनी यावेळी केल्या.

राज्यातील दोन कोटी कुटुंबांना दिलासा! तुकडेबंदी कायद्याच्या सुधारणा लागू; जमिनी होणार अधिकृत

विधानसभा मतदार याद्याच ग्राह्य; मुंबई उच्च न्यायालयात राज्य निवडणूक आयोगाची माहिती

दिल्लीतील लग्नात एअर प्युरिफायर बनले आवश्यक; प्रदूषणामुळे यजमानांकडून खास सोय

उत्तन-विरार सागरी सेतू जोडरस्त्याने वाढवणपर्यंत विस्तारास मान्यता

एक टक्का भारतीयांच्या संपत्तीत ६२ टक्क्यांनी वाढ; G20 च्या अहवालातून उघड; २३ वर्षांतील मूल्यमापन