मुंबई

Mumbai : महिला पोलिस कर्मचाऱ्याकडून पोलिस ठाण्यात जमावाशी गैरवर्तन

दक्षिण मुंबईतील एका पोलिस ठाण्यात एका महिला उपनिरीक्षकाने जमावाशी गैरवर्तन केल्याचा आरोप आहे. अधिकाऱ्यांनी या घटनेची चौकशी सुरू केली आहे, असे सोमवारी सांगण्यात आले. गिरगाव येथील व्हीपी रोड पोलिस ठाण्यात १८ सप्टेंबर रोजी घडलेल्या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे.

Swapnil S

मुंबई : दक्षिण मुंबईतील एका पोलिस ठाण्यात एका महिला उपनिरीक्षकाने जमावाशी गैरवर्तन केल्याचा आरोप आहे. अधिकाऱ्यांनी या घटनेची चौकशी सुरू केली आहे, असे सोमवारी सांगण्यात आले. गिरगाव येथील व्हीपी रोड पोलिस ठाण्यात १८ सप्टेंबर रोजी घडलेल्या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे.

अधिकाऱ्याने सांगितले की, एका महिलेसह काही लोक तक्रार दाखल करण्यासाठी पोलिस ठाण्यात आले होते. तेव्हा कर्तव्यावर असलेल्या महिला उपनिरीक्षकाने त्यांच्याशी वाद घातला. शाब्दिक बाचाबाची दरम्यान महिला अधिकाऱ्याने तिच्या गणवेशातील नावाचा टॅग काढून त्यांच्यावर फेकला. पैकी एक जण त्याच्या मोबाईल फोनवर ही घटना रेकॉर्ड करत होता, असे त्यांनी सांगितले.

घटनेची दखल घेत अधिकाऱ्यांनी गिरगाव विभागाच्या सहाय्यक पोलिस आयुक्तांकडून चौकशीचे आदेश दिले आहेत, असे अधिकाऱ्याने सांगितले.

मराठवाड्यात संततधार पाऊस; गावांचा संपर्क तुटला, जनजीवन विस्कळीत

"हास्यास्पद नाटकं करून सत्य लपवता येत नाही"; संयुक्त राष्ट्रांत पाकिस्तानवर भारताचा घणाघात

Maharashtra Rain : राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार; हवामान खात्याचा इशारा

गायक झुबीन गर्ग मृत्यू प्रकरण : आयोजक व मॅनेजरवर लुकआउट नोटीस जारी; मुख्यमंत्री सरमा म्हणाले, अन्यथा...

MPSC ची राज्यसेवा परीक्षा पुढे ढकलली