मुंबई

Mumbai Pollution : या कारणांमुळे मुंबईची हवा दिल्लीपेक्षाही खराब; वायू प्रदूषणात वाढ झाल्याने चिंता वाढली

प्रतिनिधी

मुंबईकरांसाठी (Mumbai) एक चिंता वाढवणारी बातमी म्हणजे मुंबईच्या हवेचा दर्जा (Mumbai Pollution) घसरला आहे. अहवालानुसार, मुंबईतील हवेची गुणवत्ता अत्यंत खालावली आहे. मुंबईमध्ये काही ठिकाणी हवेच्या गुणवत्ता निर्देशांकाने ३००चा तर काही ठिकाणी २००चा टप्पा पार केला आहे. ही पातळी अत्यंत खराब मानली जात असून हवा प्रचंड दुषित झाली आहे. सर्वाधिक चिंतेची बात म्हणजे, दिल्ली पेक्षाही मुंबईची हवा प्रदूषित झाली आहे. सोमवारी मुंबईची एकूण एअर क्वालिटी इंडेक्स (AQI) पातळी २२५ नोंदवण्यात आली. तर, दिल्लीची एकूण एअर क्वालिटी इंडेक्स (AQI) पातळी १५२ होती. ही आकडेवारी हवा गुणवत्ता आणि हवामान अंदाज आणि संशोधन प्रणाली (SAFAR)च्या संशोधनात समोर आली आहे.

या कारणामुळे होतेय मुंबईची हवा दूषित

सिस्टिम ऑफ एअर क्वालिटी अँड वेदर फोरकास्टिंग अँड रिसर्चचे संस्थापक प्रकल्प संचालक डॉ. गुफ्रान बेग यांनी सांगितले की, नोव्हेंबर आणि डिसेंबर २०२२मध्ये हवेची गुणवत्ता वाईट स्तरावर घसरण्यासाठी केवळ औद्योगिक स्त्रोतांद्वारे होणारे उत्सर्जन हा एकमेव घटक कारणीभूत असू शकत नाही. तर मुंबईत सुरू असणाऱ्या बांधकामामुळे होणारे उत्सर्जनामुळे उच्च हवा प्रदूषणाच्या घटना वाढणे याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. बांधकामातून उडणाऱ्या धुळीमुळे पीएम २.५ आणि पीम १० दोन्हीच्या प्रमाणात वाढ होण्यात चालना मिळून मुंबईच्या हवेची गुणवत्ता बिघडली.

पुणे विमानतळावर अपघात; 'टग ट्रॅक्टर'ला धडकले एअर इंडियाचे १८० प्रवाशांनी भरलेले विमान

गोल्डन चान्स! या फेमस Electric Scooter वर मिळतोय तब्बल १० हजार रुपयांपर्यंतचा डिस्काउंट, जाणून घ्या डिटेल्स

फक्त ६५ हजारात मिळतीये Electric Scooter, चालवण्यासाठी लायसन्सचीही गरज नाही; जाणून घ्या रेंज अन् किंमत

कार्तिक आर्यनच्या नातलगांचा घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत मृत्यू, मुंबईत झाले अंत्यसंस्कार

होर्डिंग पॉलिसी लवकरच, तोपर्यंत नवीन होर्डिंगना परवानगी नाही