मुंबईत बाल-माता मृत्युदरात घट; BMC च्या आरोग्य जागरूकतेचा परिणाम प्रातिनिधिक प्रतिमा
मुंबई

मुंबईत बाल-माता मृत्युदरात घट; BMC च्या आरोग्य जागरूकतेचा परिणाम

मुंबईच्या लोकसंख्येत सातत्याने वाढ होत असली, तरी गेल्या तीन वर्षांत शहरातील अर्भक, नवजात बालक आणि माता मृत्युदरात लक्षणीय घट झाली आहे.

अमित श्रीवास्तव

अमित श्रीवास्तव / मुंबई

मुंबईच्या लोकसंख्येत सातत्याने वाढ होत असली, तरी गेल्या तीन वर्षांत शहरातील अर्भक, नवजात बालक आणि माता मृत्युदरात लक्षणीय घट झाली आहे. वाढती आरोग्यविषयक जागरूकता, आरोग्य सुविधांची झालेली चांगली उपलब्धता आणि मुंबई मनपाने माता व बाल आरोग्यासाठी राबवलेल्या प्रभावी उपाययोजनांमुळे हा सुधारणात्मक बदल घडून आल्याचे मानले जात आहे.

मनपाच्या आकडेवारीनुसार, शहराची अंदाजित लोकसंख्या २०२२ मधील १.२९ कोटींवरून वाढून २०२५ मध्ये १.३१ कोटी झाली आहे. मात्र, याच कालावधीत मृत्युदराचे प्रमुख संकेतक लक्षणीय सुधारले असून, सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात मोठे यश मिळाले असल्याचे यातून दिसून येते.

शहरातील एकूण मृत्यूंची संख्या बहुतांशी स्थिर राहिली आहे, २०२२ मधील ९४,५५३ वरून २०२५ मध्ये ही संख्या तात्पुरत्या आकडेवारीनुसार ९५,७८० पर्यंत किरकोळ वाढली आहे. परंतु, नवजात बालके, अर्भक आणि मातांच्या मृत्यूच्या संख्येत मोठी घसरण नोंदवली गेली आहे.

अशी झाली घट

सर्वात लक्षणीय सुधारणा नवजात बालकांच्या मृत्यूच्या संख्येत दिसून आली. हे मृत्यू २०२२ मधील १,८४६ वरून २०२५ मध्ये १,१४८ पर्यंत खाली आले असून, यात जवळपास ३८ टक्क्यांची घट झाली आहे.

अर्भक मृत्यूंमध्येही लक्षणीय घट झाली असून २०२२ मधील २,९६२ वरून २०२५ मध्ये ही संख्या २,०६९ वर आली आहे, म्हणजेच यात जवळपास ३० टक्क्यांची घट झाली आहे.

माता मृत्यूंमध्ये किंचित वाढ

पाच वर्षांखालील मुलांच्या मृत्यूची संख्या २०२२ मधील ३,५६६ वरून २०२५ मध्ये ३,१४२ पर्यंत घसरली आहे. माता मृत्यूंची संख्या २०२२ मधील ९२ वरून २०२५ मध्ये ७४ वर आली आहे. २०२४ मध्ये नोंदवलेल्या ७० प्रकरणांच्या तुलनेत २०२५ मध्ये माता मृत्यूंमध्ये किंचित वाढ झाली आहे.

विविध आरोग्य सुविधांमुळे बदल शक्य

रुग्णालयातील प्रसूतींचे वाढलेले प्रमाण, प्रसूतीपूर्व आणि प्रसूतीनंतरची उत्तम काळजी, लसीकरणाची वाढलेली व्याप्ती, अति-जोखमीच्या गर्भधारणेचे वेळेत निदान आणि पालिकेच्या रुग्णालयांमध्ये नवजात अतिदक्षता विभागांचे सक्षमीकरण यामुळे हा बदल शक्य झाला आहे, असे आरोग्यतज्ज्ञ चेतन कोठारी यांनी सांगितले.

(इंग्रजीत वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

गरज असेल तरच घराबाहेर पडा; महाराष्ट्रासह २६ राज्यांना १३ तास संकटाचे, हवामान खात्याचा इशारा

इराण युद्धामुळे ही व्यक्ती बनली अब्जाधीश

आजचे राशिभविष्य, २७ ऑगस्ट २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

नारळी पौर्णिमेसाठी गोड मेजवानी; 'हे' पदार्थ नक्की ट्राय करा

Video : नेपाळमध्ये महाप्रलय! भोटे कोशी नदीला अचानक महापूर; अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती, किमान १०५ भारतीय पर्यटक बेपत्ता