Mumbai : दगडाने हल्ला केल्याच्या आरोपातून तरुण निर्दोष; सत्र न्यायालयाचा सरकारी पक्षाला मोठा झटका संग्रहित छायाचित्र
मुंबई

Mumbai : दगडाने हल्ला केल्याच्या आरोपातून तरुण निर्दोष; सत्र न्यायालयाचा सरकारी पक्षाला मोठा झटका

सख्ख्या भावावर दगडाने हल्ला करून खुनाचा प्रयत्न केल्याच्या आरोपातून तरुणाची सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली.

Swapnil S

मुंबई : सख्ख्या भावावर दगडाने हल्ला करून खुनाचा प्रयत्न केल्याच्या आरोपातून तरुणाची सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. पुरावा अपुरा असल्याने आणि साक्षीदारांनी फिर्यादी पक्षाला साथ न दिल्याने न्यायालयाने हा निर्णय दिला. या निर्णयामुळे सरकारी पक्षाला झटका बसला. अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. बी. बोहरा यांनी हा निकाल दिला.

१ जानेवारी २०२५ रोजी पहाटे सुमारे २.१५ वाजता मलबार हिल येथील जयप्रकाश झोपडपट्टी, धुरी टी स्टॉलसमोर घडली होती. आरोपी भावेश कोठेरे याने दारू पिण्यासाठी पैसे मागितले. त्याचा भाऊ दिपेश याने पैसे देण्यास नकार दिल्याने वाद झाला. रागाच्या भरात भावेशने दगडाने दिपेशच्या डोक्यावर मारहाण केली, असा आरोप होता. दिपेश रक्तबंबाळ अवस्थेत जमिनीवर पडला होता. त्याला भाटिया रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

या प्रकरणी मलबार हिल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपीवर खुनाचा प्रयत्न या कलमाखाली खटला चालवण्यात आला.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

UPI वापरणाऱ्या दुकानदारांसाठी खूशखबर! NPCI ने आणली शानदार स्कीम, कसा होणार फायदा? वाचा सविस्तर

एम.एस्सी. नर्सिंग महाविद्यालय ठाण्यात; प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या परिसरात महाविद्यालयाला मान्यता

भाडेकरू फ्लॅट खाली करत नाहीये? आता मनमानी चालणार नाही; मुंबई पोलिसांकडून पहिल्यांदाच घराचा ताबा सोडण्याचे आदेश

Mumbai : नव्या सभागृहाचा मार्ग मोकळा! ३२९ नगरसेवकांसाठी प्रशस्त सभागृह उभारण्यास स्थायीची मंजुरी

ठाणे स्थानकातील सरकते जिने प्रवाशांसाठी गैरसोयीचे; १२ डब्यांच्या लोकलमधील प्रवाशांची फरफट, फलाट ५ आणि ६ वरील नियोजनावर प्रश्नचिन्ह