मुंबई

मुंबईकरांना आता मिळणार २४ तास वीजपुरवठा;पालिका खर्चणार चार हजार कोटी रुपये

गिरीश चित्रे

दक्षिण मुंबईतील वीजपुरवठा सुरळीत व अखंडित सुरू राहावा, यासाठी एक हजार किलोमीटरच्या नवीन केबल टाकण्यात येणार आहे. पुढील दोन ते तीन वर्षांत नवीन केबल टाकण्याचे नियोजन केले असून, या कामासाठी तब्बल ३,५०० कोटी रुपये खर्च करण्यात येणार असल्याची माहिती बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र यांनी दैनिक ‘नवशक्ति’शी बोलताना दिली.

दक्षिण मुंबईत वीजपुरवठा करणाऱ्या बेस्ट उपक्रमाकडे १० लाख ५० वीजग्राहक आहेत. यात आठ लाख निवासी तर दोन लाखांहून अधिक व्यावसायिक वीजग्राहक आहेत. वीजग्राहकांना सुरळीत वीजपुरवठा करण्याची जबाबदारी बेस्ट उपक्रमाच्या विद्युत विभागातील अधिकारी व कर्मचारी पार पाडतात. वीजपुरवठा करणाऱ्या केबल जुन्या झाल्या असून, वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याच्या तक्रारी बेस्ट उपक्रमाच्या नियंत्रण कक्षास प्राप्त होतात. वीजग्राहकांना सुरळीत व अखंडित वीजपुरवठा करणे बेस्ट उपक्रमाची जबाबदारी आहे. वीज मीटरचे रिडिंग होत नसल्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी आता स्मार्ट इलेक्िट्रक मीटर बसवण्यात येणार आहेत. यामुळे वीजपुरवठा खंडित झाल्यास बेस्ट उपक्रमाच्या कॉल सेंटरच्या माध्यमातून वीजग्राहकांना वीजपुरवठा खंडित झाल्याचा त्वरित मेसेज जाईल आणि वेळेत वीजपुरवठा पूर्ववत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. वीजपुरवठा खंडित होण्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी एक हजार किलोमीटरच्या नवीन केबल टाकण्यात येणार आहेत. तर २०० ते ३०० किलोमीटरच्या केबल बदलण्यात येणार आहेत.

"...मी कोणाच्या बापाचेही ऐकत नाही", अजित पवार यांचा विरोधकांना इशारा

ठाकरेंसाठी मोदींची साखरपेरणी; बाळासाहेबांवर स्तुतिसुमने

कल्याणमध्ये ठाकरेंची नवी खेळी; माजी महापौर रमेश जाधवही मैदानात, दरेकर की जाधव, लढणार कोण?

प्रादेशिक असमतोलाचे भान राखणे गरजेचे!

भय संपलेले नाही...