प्रातिनिधिक फोटो
मुंबई

मुंबईतील पर्यटनस्थळी पालिका १४ वातानुकूलित शौचालय बांधणार; डीपीडीसी ३५ कोटी रुपये करणार खर्च; बांधकामासाठी निविदा

मुंबईतील पर्यटनस्थळी येणाऱ्या पर्यटकांची गैरसोय होऊ नये आणि परिसरात अस्वच्छता पसरू नये यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत.

Swapnil S

मुंबई : मुंबईतील पर्यटनस्थळी येणाऱ्या पर्यटकांची गैरसोय होऊ नये आणि परिसरात अस्वच्छता पसरू नये यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. पर्यटनस्थळी येणाऱ्या पर्यटकांसाठी आता वातानुकूलित १४ शौचालय बांधण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. यासाठी तीन शौचालय बांधणीसाठी निविदा प्रक्रिया राबवण्यात आली आहे. जिल्हा नियोजन समितीकडून (डीपीडीसी) निधी दिला जाणार असून, ३५ कोटी रुपये खर्च केला जाणार आहे. असल्याचे सांगण्यात आले.

मुंबई शहरातील पर्यटन स्थळांना भेटी देण्यासाठी देश विदेशातील पर्यटक भेटी देतात. पर्यटन स्थळांच्या ठिकाणी चांगल्या स्थितीतील शौचालयांची सुविधा नसल्याने पर्यटकांची विशेषतः महिलांना गैरसोयींना सामोरे जावे लागते. मुंबई शहराचे पालक मंत्री दीपक केसरकर यांनी पर्यटनस्थळी शौचालये बांधण्याची सूचना केली होती. एकूण १४ शौचालये बांधण्यासाठी ३५ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. तीन ठिकाणी शौचालय बांधकामासाठी निविदा काढण्यात आली आहे.

ए विभागात ५ ठिकाणी, डी विभागात २, जी -दक्षिण विभागात ३, जी - नॉर्थ विभागात २ आणि ई आणि एफ - नॉर्थ विभागात प्रत्येकी एका ठिकाणी ही शौचालये बांधली जाणार आहेत. या स्वच्छतागृहांच्या देखभालीसाठी महापालिकेने एटीएम, खाद्यपदार्थांचे स्टॉल आदींचा आराखडा तयार केला आहे. यामुळे स्वच्छतागृहांच्या देखभालीचा खर्च भागवता येणार असल्याचे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले.

मुंबई महापालिकेकडून मुंबईत ८५०० हून अधिक सार्वजनिक शौचालये बांधली आहेत. ही स्वच्छतागृहे चालवण्याची व देखभाल करण्याची जबाबदारी सामाजिक संस्थांवर देण्यात आली आहे.

सार्वजनिक शौचालयांची अवस्था दयनीय !

मुंबई महापालिकेने उघड्यावर शौचास जाणे थांबवण्यासाठी मुंबईत स्वच्छतागृहांची संख्या वाढवण्यात आली. २०१८ मध्ये महापालिकेने लॉट-११ अंतर्गत ९२०.३९ कोटी रुपये खर्चून १९,८०९ जागा असलेली ८३२ शौचालये बांधली होती. तसेच २०२२-२३ मध्ये १९,०५६ आसनांची ८०९ शौचालये बांधण्यात आली. या शौचालयांवर एकूण १३६.६६ कोटी रुपये खर्च करण्यात आले. परंतु शौचालयांची वेळेवर दुरुस्ती व आवश्यक देखभाल होत नसल्याने यातील बहुतांश स्वच्छतागृहांची अवस्था दयनीय झाली आहे.

ओला दुष्काळ जाहीर करण्यास मुख्यमंत्री फडणवीसांचा नकार; पण सर्व सवलती लागू, दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदतीचे आश्वासन

"२६/११ नंतर पाकिस्तानला प्रत्युत्तर देणार होतो, पण...; पी. चिदंबरम यांचा गौप्यस्फोट

Pakistan Blast : पाकिस्तान हादरले! क्वेट्टामध्ये आत्मघाती बॉम्बस्फोट, १० ठार, भयानक व्हिडिओ समोर

Dombivali : झोपेतच सर्पदंश! ३ वर्षांच्या चिमुकलीसह मावशीचा मृत्यू; KDMC रुग्णालयावर निष्काळजीपणाचा आरोप

पावसाची विश्रांती; पूरस्थिती कायम! पूरग्रस्त शेतकऱ्यांना हवा मदतीचा आधार; अतिवृष्टी, गारपीट, टंचाईग्रस्तांना जिल्हा वार्षिक निधीतून मदत