मुंबई

'अधीश' वाचवण्यासाठी नारायण राणेंनी घेतली उच्च न्यायालयात धाव

प्रतिनिधी

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी अधीश बंगला वाचविण्यासाठी नव्याने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. बंगल्याचा अनियमित भाग नियमित करण्यासाठी त्यांनी अर्ज केला आहे. हा अर्ज सुनावणी घेण्यास योग्य कसा, हे न्यायालयाला पटवून द्या, असे निर्देश न्यायमूर्ती आर. डी. धनुका आणि न्यायमूर्ती कमल खटा, यांच्या खंडपीठाने बृहन्मुंबई महानगरपालिकेला दिले.

जुहू येथील अधीश बंगल्यातील काही भाग पाडण्यासंदर्भात मुंबई पालिकेने नारायण राणेंच्या कुटुंबातील भागधारक असलेल्या कालका रिअल इस्टेट प्रा. लि. या कंपनीला मार्चमध्ये नोटीस बजावली. १५ दिवसांत बंगल्यातील बांधकाम हटवण्याचे आदेशही दिले होते. या नोटिशीला राणे यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले त्यावेळी बांधकाम नियमित करण्याचा प्रस्ताव करून त्यावर सुनावणी देऊन राणेंच्या प्रस्तावावर निर्णय घेण्याचे आदेश न्यायालयाने पालिकेला दिले होते.

"तो मुलाच्या बर्थडे पार्टीचा प्लॅन करत होता, आता आम्ही त्याच्या अंत्यसंस्काराची योजना आखतोय": पूंछ हल्ल्यातील शहीद जवानाचे नातलग

'ही' परवडणारी कार देते 25 Kmplचं भन्नाट मायलेज! ग्राहकांना लावलंय वेड

जीवघेणा रेल्वे प्रवास; सर्वाधिक महसूल गोळा करणाऱ्या रेल्वेला प्रवाशांच्या जीवाचे मोल शून्य

आई-बापानेच मुलगी, नातवाच्या मदतीने केली स्वतःच्या मुलाची हत्या

तिसऱ्या टप्प्यातील प्रचार संपला,मंगळवारी दिग्गजांचे भवितव्य ठरणार!