मुंबई

जागर आदिशक्तिचा! वाईट शक्तीचा नायनाट करणाऱ्या कलकी अवताराचा देखावा; नवतरुण सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळाची जनजागृती

गिरीश चित्रे

मुंबई : एखाद्या गोष्टीचा अतिरेक झाला तर त्याचा नाश करण्यासाठी एखादी शक्ती जन्म घेते. राज्यात गेल्या काही दिवसांपासून महिला अत्याचार, शाळकरी मुलींवर होणारे अत्याचार, फसवणूक, आर्थिक गुन्हे संबंधित घटना वाढल्या आहेत. अशाच वाईट शक्तीचा नायनाट करण्यासाठी कलकी अवतार घेण्याची आवश्यकता चित्र देखाव्यातून मांडण्याचा प्रयत्न शीव येथील प्रतिक्षा नगरमधील नवतरुण सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळाने केला आहे.

एखाद्या वाईट गोष्टीचा शेवट होतोच, हे नमूद करणारा कलकी अवतार साकारण्यात आल्याचे नवतरुण सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळाचे अध्यक्ष अविनाश किरवे यांनी 'दैनिक नवशक्ति'ला सांगितले.

नवतरुण सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळाचे यंदा २५ वे वर्षे आहे. दरवर्षी जनजागृती करणारे देखावे साकारण्यात येतात. देशात राज्यात महिलांवरील अत्याचार, बालगुन्हेगारी, अंमली पदार्थांचा विक्री, सेवन आदीचे प्रमाण वाढले आहे. एखाद्या गोष्टीचा अतिरेक झाला, तर त्याचा शेवट हा होतोच. एखाद्या गोष्टीचा नायनाट करण्यासाठी कलकी अवतार घेणार, असे कथापुराणात सांगितले जाते. कथा पुराणातील उल्लेखाचा आधार घेत लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी यंदा नवतरुण सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळाने कलकी अवताराचा चित्र देखावा साकारला आहे.

राम, कृष्णाने अवतार घेतला असे पुराणिक कथेत सांगितले जाते. त्याच आधारावर वाईट शक्तीचा नाश करण्यासाठी कलकी अवतार घेणार असे चित्र देखाव्यातून मांडण्यात आले आहे. लोकांमध्ये जनजागृती निर्माण करणे हा मुख्य उद्देश असल्याचे किरवे यांनी सांगितले.

सामाजिक दायित्व उपक्रम

दरवर्षीप्रमाणे यंदाही आरोग्य शिबीर, मेडिकल कॅम्प, सांस्कृतिक कार्यक्रम असे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. गरजुंना मदतीचा हात, शालेय उपयोगी वस्तुंचे विद्यार्थ्यांना वाटप असे कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत.

मदतीसाठी खारीचा वाटा

मार्च २०२० मध्ये देशात कोरोनाचा शिरकाव झाला आणि मुंबईत ही कोरोनाचा फैलाव झाला. कोरोना काळात कोण कोणाशी बोलत नव्हते, मदत करणे तर दूरच. मात्र नवतरुण सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळाने आपल्या परीने कोरोना काळात मदतीचा हात पुढे केला. माळीण गावात जमीन धसली आणि गावच्या गाव गाडले गेले, त्यावेळी मदतीचा हात पुढे करण्यात आल्याचे ते म्हणाले.

Mumbai Local Mega Block Update : प्रवाशांनो लक्ष द्या...रविवारी तिन्ही रेल्वे मार्गांवर ब्लॉक, जाणून घ्या डिटेल्स

पंतप्रधान मोदींच्या हस्ते आज Metro-3 चे उद्घाटन; अंतर्गत रिंग मेट्रो, ठाणे पालिकेच्या नवीन इमारतीचेही भूमिपूजन

पुणे : बोपदेव घाटात तरुणीवर सामूहिक बलात्कार; पोलिसांकडून संशयित आरोपींचे स्केच जारी

निराधार दुर्गांची जीवनभरारी! बालगृहातील भगिनी ते अधीक्षिका; सांगलीच्या सपनाचा स्फूर्तिदायी प्रवास

इस्त्रायलचा खात्मा करणार; इराणचे सर्वोच्च नेते खामेनी यांची गर्जना