मुंबई

Jitendra Awhad : आव्हाड यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला

प्रतिनिधी

राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राजीनामा दिला. आव्हाड यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला. पत्रकार परिषद घेऊन जयंत पाटील यांनी याबाबत माहिती दिली. पोलीस यंत्रणा कोणाच्या तरी सांगण्यावरून काम करत असल्याचा गंभीर आरोप यावेळी पाटील यांनी केला. सततच्या होणाऱ्या खालच्या पातळीवरील आरोपांमुळे आव्हाड त्रस्त आहेत. पोलिसही स्वतः कायदा पाळत नसल्याने आव्हाड यांनी राजीनामा माझ्याकडे सुपूर्द आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा करून लवकरच निर्णय घेतला जाईल. विनयभंगाचा कोणताही पुरावा नसल्याने खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी क्लिप पाहावी. याकडे मुख्यमंत्री लक्ष देतील अशी अपेक्षा असल्याचे पाटील म्हणाले.

नेमके काय आहे प्रकरण-

महिला विनयभंग प्रकरणात भाजपच्या महिला पदाधिकाऱ्याला धक्काबुक्की केल्याचा आरोप आहे. जितेंद्र आव्हाड हे सुरक्षा रक्षकांसह गर्दीतून जात होते. यावेळी त्यांच्यासमोर एक महिला आली. त्यावेळी त्या महिलेला बाजूला करण्यात आले. त्यानंतर महिलेने विनयभंगाचा आरोप केला आहे. त्यानंतर आव्हाड यांच्यावर मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सदर महिलेने आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा आरोप केला आहे. त्यामुळे आव्हाड वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. आपल्यावर ७२ तासांत दोन खोटे गुन्हे दाखल करण्यात आल्यामुळे आपण आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्याचे आव्हाड यांनी म्हटले आहे.

Jitendra Awhad : ठाण्यात महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल, आमदार पदाचा राजीनामा देणार ?

भर सभेत रडले रोहित पवार...सुप्रिया सुळेंच्या प्रचारसभेत नेमकं काय घडलं?

घसा बसलेला असतानाही शरद पवारांनी केलं भाषण, सुप्रिया सुळेंची सांगता सभा गाजवली

भारतीय महिला ऑस्ट्रेलिया, पाकिस्तानसह एकाच गटात; महिलांच्या टी-२० विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर

बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना जमावानं जीव जाईपर्यंत मारलं, नेमका कुठं घडला प्रकार?

कांदा निर्यातबंदी उठवली! ४० टक्के निर्यातकरामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष कायम