मुंबई

आता दादरऐवजी परळवरून १२ गाडया सुटणार

नवशक्ती Web Desk

मुंबई : दादर रेल्वे स्थानक मुंबईतील सर्वाधिक गर्दीचे ठिकाण आहे. यातील गर्दी कमी करायला दादरहून सुटणाऱ्या १२ गाड्या परळवरून सोडण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. येत्या १५ सप्टेंबरपासून याची अंमलबजावणी होणार आहे.

दादरहून रोज २.५ लाख प्रवासी प्रवास करतात. दादरमधील गर्दी कमी करायला १२ गाड्या दादरहून परळहून सोडण्याचा निर्णय घेतला. या गाड्या सध्या दादरच्या फलाट क्रमांक दोन वरून सुटतात.

तसेच दादरच्या फलाट एकची रुंदी वाढवली जाणार आहे. सध्या ती ७ मीटर असून ती १०.५ मीटर केली जाणार आहे. यासाठी १ कोटी रुपये खर्च होणार आहे. हा प्रकल्प दोन महिन्यात पूर्ण होईल.मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. शिवराज मानसपुरे म्हणाले की, या फलाटाची रुंदी वाढवल्याने तेथे नवीन एक्स्लेटर बसवता येऊ शकतील. तसेच पुलाचा विस्तार होऊ शकेल.

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस