मुंबई

चेंबूरमध्ये १९ वर्षीय विद्यार्थीनीवर बलात्कार

पीडितेला स्प्राइटमधून गुंगीचे औषध दिल्यावर ती बेशुद्ध पडली. त्यानंतर दोघांनी तिच्यावर बलात्कार केला.

प्रतिनिधी

मुंबई : चेंबूरमधील पोस्टल कॉलनीतील भाभा अणु संशोधन केंद्राच्या (बीएआरसी) क्वार्टर्समध्ये एका १९ वर्षीय कॉलेज विद्यार्थीनीवर दोन मुलांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

चेंबूर पोलिसांच्या माहितीनुसार, १५ आणि १६ नोव्हेंबरच्या मध्यरात्री रात्री १० ते १२.३० वाजताच्या सुमारास ही घटना घडली. पीडित मुलगी पालघर जिल्ह्यातील बोईसर येथे आई आणि बहिणीसोबत राहत असून सध्या ती बीएआरसीमध्ये काम करणाऱ्या वडिलांसोबत राहत होती. वर्षभरापूर्वी मा म्युनिसिपल हॉस्पीटलसमोर असलेल्या याच कॉम्प्लेक्समध्ये त्यांच्या वडिलांना बीएआरसीकडून फ्लॅट मिळाला आहे. आरोपी अजित कुमार यादव (२६) याचे वडीलही बीएआरसीमध्ये काम करत असून त्यांच्या फ्लॅट पीडितेच्या शेजारीच आहे. अजित आणि पीडित मुलगी एकमेकांना ओळखत असून अजितच्या घरचे बाहेरगावी गेले असल्यामुळे त्याने आपला मित्र प्रभाकर यादवला (३०) घरी बोलावले होते. त्यानंतर जेवण बनवण्याच्या बहाण्याने या दोघांनी तिला घरी बोलावून घेतले.

पीडितेला स्प्राइटमधून गुंगीचे औषध दिल्यावर ती बेशुद्ध पडली. त्यानंतर दोघांनी तिच्यावर बलात्कार केला. १२.३० वाजताच्या सुमारास शुद्धीत आल्यानंतर आपल्यावर बलात्कार झाल्याचे तिच्या लक्षात आले. त्यानंतर धावतच ती आपल्या घरात गेली आणि घडलेला प्रकार जवळच्या मित्रांना सांगितला. त्यानंतर गुरुवारी तिने पोलिसांकडे गुन्हा दाखल केला. प्राथमिक माहितीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून दोन्ही आरोपींना अटक केली आहे. दोघांना कोर्टात हजर केले असता, त्यांना २० नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. पोलिसांनी आरोपीच्या घरातून कोल्ड्रिंक जप्त केले असून ते फॉरेन्सिक तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले आहे. पीडितेची वैद्यकीय चाचणी झाल्यानंतर पुराव्यांनिशी आरोपपत्र दाखल करण्यात येईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.

दारूवरील व्हॅट, परवाना शुल्कवाढीला विरोध; सोमवारी राज्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स बंद

नवी मुंबई विमानतळावरून सप्टेंबरअखेरीस टेक ऑफ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

Ahmedabad Plane Crash: इंधन पुरवठा बंद, विमान कोसळले; एएआयबीचा प्राथमिक अहवाल सादर, वैमानिकांमधील अखेरचा संवाद उघड

शरद पवार गटाचे नवे कॅप्टन शशिकांत शिंदे ? मंगळवारी प्रदेशाध्यक्ष पदाची घोषणा, जयंत पाटील पायउतार होणार

आयफोन, आयवॉचने कळणार स्त्री गर्भवती आहे का? कृत्रिम बुद्धिमत्तेची मदत