संग्रहित छायाचित्र पीटीआय
मुंबई

दीड लाख प्रवाशांना एक्स्प्रेसमधून खाली उतरवले, कन्फर्म तिकिटाशिवाय प्रवास करणाऱ्यांविरोधात मोहीम

आरक्षित तिकीटशिवाय मेल-एक्सप्रेसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांविरोधात गेल्या दिड महिन्यात १ लाख ६० हजार प्रवाशांना मेल, एक्सप्रेसमधून खाली उतरविण्यात आले आहे.

Swapnil S

मुंबई : कन्फर्म तिकिटाशिवाय मेल-एक्स्प्रेसच्या आरक्षित डब्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर कारवाई करण्याची धडक मोहीम मध्य रेल्वेने हाती घेतली आहे. त्यानुसार आरक्षित तिकीटशिवाय मेल-एक्सप्रेसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांविरोधात गेल्या दिड महिन्यात १ लाख ६० हजार प्रवाशांना मेल, एक्सप्रेसमधून खाली उतरविण्यात आले आहे.

रेल्वे बोर्डाच्या आदेशानुसार, मध्य रेल्वेने मेल एक्स्प्रेसचे आरक्षण नसताना आरक्षित डब्यांमधून प्रवास करणाऱ्यांविरोधात कारवाई सुरू केली आहे. त्यानुसार मध्य रेल्वेने आरक्षित डब्यातून प्रवाशांना खाली उतरविण्याची मोहीम १४ जून पासून सुरू केली आहे. या कारवाईनुसार, गेल्या दिड महिन्यात १ लाख ६० हजार प्रवाशांना मेल / एक्सप्रेसमधून खाली उतरविण्यात आले आहे. सुरुवातीला एका दिवसांत १ हजार ७०० प्रवाशांना रेल्वे गाड्यांतून खाली उतरविण्यात आले होते. दिड महिन्यांपासून मुंबई विभागात ही कारवाई करण्यात येत आहे.

सोशल मीडियावरून रेल्वेकडे अनेक तक्रारी आल्या होत्या. या तक्रारीमध्ये आरक्षण डब्यांत वेटिंग तिकिटावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांमुळे उर्वरित प्रवाशांना त्रास होत असल्याचे नमूद करण्यात आले होते. आरक्षित तिकिटावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना शौचालयासह डब्यांतून ये-जा करण्यास त्रास होत होत होता. या तक्रारी दाखल झाल्यानंतर रेल्वेकडून ही कारवाई हाती घेण्यात आली आहे.

लोकल तिकिटावर मेल/एक्सप्रेसमधून प्रवास

बहुतांशी प्रवासी लोकल तिकिटावर कर्जत, कसारा, कल्याणपर्यंत मेल/एक्स्प्रेसमधून प्रवास करीत असल्याच्या प्रवाशांच्या तक्रारी होत्या. मध्य रेल्वेने २९ मेल/एक्स्प्रेसमध्ये ही कारवाई करत सुमारे १७०० प्रवाशांना खाली उतरविण्यात आले.

वेटिंग तिकिटावर आरक्षित डब्यातून प्रवास

तिकीट खिडकीवर काढलेले तिकीट वेटिंग आले, तरी बहुतांश प्रवासी आरक्षित डब्यातून प्रवास करतात. अशा प्रवाशांना टीसीकडून आरक्षित डब्यातून प्रवास करण्यास परवानगी देण्यात येत होती; मात्र अनारक्षित तिकिटावर आरक्षित डब्यातून प्रवास करता येणार नसल्याची उद्घोषणा रेल्वे स्थानकांवर करण्यात येत आहे.

विरार-अलिबाग अंतर दोन तासांत पार होणार; मल्टिमॉडेल मार्गिकेला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी

मराठा आंदोलनाचा विजय! अखेर मनोज जरांगे-पाटलांनी पाचव्या दिवशी उपोषण सोडले; राज्य सरकारकडून ८ पैकी ६ मागण्या मान्य

घटनेतील तरतुदींचे स्पष्टीकरण करणार, सर्वोच्च न्यायालयाची माहिती; राष्ट्रपती, राज्यपालांवर विधेयकावर कालावधीचे बंधन

चीनकडून भव्य लष्करी संचलनात अत्याधुनिक शस्त्रांचे आज प्रदर्शन

GST परिषदेची आज बैठक; दैनंदिन वापरातील वस्तूंवरील कर कमी होण्याची शक्यता