मुंबई

ज्येष्ठ नागरिकांसाठी गणपती दर्शनयात्रेचे आयोजन; पर्यटन विभाग तथा विविध महापालिकांचा उपक्रम

राज्याचे पर्यटन, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता आणि महिला व बालकल्याणमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले

प्रतिनिधी

कोरोनाचे संकट ओसरल्यानंतर दोन वर्षांनंतर गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा केला जात आहे. गणेशोत्सव व स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त राज्याचा पर्यटन विभाग व स्थानिक महापालिकांनी संयुक्तपणे मुंबई, ठाणे, पुणे व नागपूर या महानगरांतील ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी गणपती दर्शनयात्रेचे आयोजन केले आहे. १, २, ५, ६ व ७ सप्टेंबर या पाच दिवशी ही यात्रा आयोजित करण्यात येणार आहे. दरम्यान, या योजनेचा जास्तीत जास्त ज्येष्ठ नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन राज्याचे पर्यटन, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता आणि महिला व बालकल्याणमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले आहे.

महाराष्ट्रातील सार्वजनिक गणेशोत्सव हा एक महत्त्वाचा सांस्कृतिक सोहळा समजला जातो. राज्यभरातील गणेशोत्सव मंडळे आपापल्या परिसरात नयनरम्य देखावे, सांस्कृतिक कार्यक्रम व सामाजिक उपक्रम इत्यादी माध्यमातून अतिशय उत्साहाच्या वातावरणात गणेशोत्सव साजरा करतात. कोरोना महामारीदरम्यान गणेशोत्सव साजरा करण्यावरही स्वाभाविक मर्यादा आल्या होत्या; परंतु दोन वर्षांनंतर प्रथमच राज्यभरात मोठ्या उत्साहात व निर्बंधरहित वातावरणात गणेशोत्सवाचे आयोजन होणार आहे.

मंदिरात थेट प्रवेश

राज्याच्या पर्यटन विभागातर्फे ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या शहरांतील प्रसिद्ध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे व गणेश मंदिरांची यात्रा घडविली जाईल. यासाठी बृहन्मुंबई, ठाणे, पुणे व नागपूर महानगरपालिकेकडून वातानुकूलित बसेस, आरोग्यसेवक, गाईड व न्याहारी अशा सुविधा दिल्या जातील. तसेच सर्व मंडळे व मंदिरात श्री गणपती दर्शनासाठी थेट प्रवेश दिला जाईल. अधिक माहिती तसेच नोंदणीसाठी ७७३८६९४११७ अथवा ८७७९८९८००१ या क्रमांकावर संपर्क साधावा.

शिवरायांचे किल्ले ‘युनेस्को’च्या जागतिक वारसास्थळ यादीत

मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्याचा कॅनडातील कपिल शर्माच्या कॅफेवर गोळीबार

सरकारची इलेक्ट्रिक ट्रक प्रोत्साहन योजना सुरू; PM e-Drive अंतर्गत ९.६ लाख रु.मिळणार

टेस्ला पुढील आठवड्यात भारतात प्रवेश करण्यास सज्ज; वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये पहिले शोरूम सुरू करणार

अजित पवारांची माफी मागा! लक्ष्मण हाके यांना राष्ट्रवादीची नोटीस