Palghar : संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेसाठी खा. डॉ. हेमंत सवरा यांची निवड 
मुंबई

Palghar : संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेसाठी खा. डॉ. हेमंत सवरा यांची निवड

भारत सरकारतर्फे १९ ते २३ ऑक्टोबर २०२६ दरम्यान न्यूयॉर्क येथे होणाऱ्या संयुक्त राष्ट्र महासभेच्या ८१ व्या सत्रासाठी पाठवण्यात येणाऱ्या २० खासदारांच्या उच्चस्तरीय शिष्टमंडळात पालघर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. हेमंत विष्णू सवरा यांची विशेष निवड करण्यात आली आहे.

Swapnil S

वसई : भारत सरकारतर्फे १९ ते २३ ऑक्टोबर २०२६ दरम्यान न्यूयॉर्क येथे होणाऱ्या संयुक्त राष्ट्र महासभेच्या ८१ व्या सत्रासाठी पाठवण्यात येणाऱ्या २० खासदारांच्या उच्चस्तरीय शिष्टमंडळात पालघर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. हेमंत विष्णू सवरा यांची विशेष निवड करण्यात आली आहे.

या शिष्टमंडळात निवडक आणि अभ्यासू खासदारांचा समावेश करण्यात आला असून, त्यात डॉ. हेमंत सवरा यांना स्थान मिळणे ही पालघर जिल्ह्यासाठी आणि संपूर्ण महाराष्ट्रासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे. या दौऱ्यात ते संयुक्त राष्ट्रसंघात होणाऱ्या विविध जागतिक विषयांवरील चर्चा, धोरणात्मक बैठका आणि परिसंवादांमध्ये भारताची भूमिका समर्थपणे मांडण्याची संधी मिळणार आहे.

डॉ. हेमंत सवरा यांच्या सामाजिक, राजकीय आणि वैद्यकीय क्षेत्रातील दांडग्या अनुभवाचा या आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी मंडळात भारताला नक्कीच फायदा होईल. या महत्त्वपूर्ण निवडीबद्दल खासदार डॉ. हेमंत सवरा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, परराष्ट्र मंत्री जयशंकर यांचे आभार मानले आहेत.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

मुंबईकरांनो, पाण्याचा गैरवापर केला तर कारवाई! २०२७ पर्यंतच्या पाणी नियोजनाचे आव्हान, १० टक्के पाणीकपात कायम

Mumbai : महाविद्यालयीन विद्यार्थ्याचे अपहरण; १४ हजार लुटले, तिघा सराईत गुन्हेगारांना अटक

सर्वोच्च न्यायालयावर दबावाचा प्रयत्न - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Mumbai : कोस्टल रोडच्या भरावात अनधिकृत मातीचा वापर; कंत्राटदाराला पालिकेची नोटीस

रॉबर्ट हॉल, मायकेल वूडफर्ड यांना अर्थशास्त्राचे नोबेल