मुंबई

ख्वाजा युनूस प्रकरणात माफी द्या! बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे याची न्यायालयाकडे मागणी

या खटल्याला दोन दशकाहून काळ गेला असून तो अजून सुरू झालेला नाही. तसेच या प्रकरणात आपला कोणताही सहभाग नाही, असे वाझेने सांगितले.

Swapnil S

चारुल शहा-जोशी/मुंबई

पोलिसांच्या ताब्यात असलेल्या ख्वाजा युनूस याच्या मृत्यूप्रकरणी मला माफी द्यावी, अशी मागणी बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे याने सत्र न्यायालयाकडे केली आहे. या खटल्याला दोन दशकाहून काळ गेला असून तो अजून सुरू झालेला नाही. तसेच या प्रकरणात आपला कोणताही सहभाग नाही, असे वाझेने सांगितले.

वाझेने सोमवारी न्यायालयात चार पानांचा मोठा अर्ज सादर केला. युनूसच्या हत्या प्रकरणात आपला संबंध नाही. या प्रकरणात माझा जबाब नोंदवावा. मी कोर्टाला खरी व पूर्ण सत्य माहिती देईन. पण, मला या प्रकरणातून माफी द्यावी, असे त्याने म्हटले.

हे प्रकरण २० वर्षांपासून प्रलंबित आहे. त्याचा मोठा त्रास मला होत आहे. या विलंबामुळे माझ्या जीवनावर व माझ्या नावावर बट्टा लागला आहे. समाजातील माझ्या स्थानाला धक्का लागला.

या खटल्यातील महत्त्वाचा पैलू सर्वोच्च न्यायालयासमोर प्रलंबित आहे. त्याचा निकाल नजीकच्या भविष्यात येण्याची शक्यता नाही. या खटल्याचा निकाल तातडीने सुरू होईल असे वाटत नाही. त्यामुळे हा खटला संपेल. अजून काही वर्षे लागतील. मी ज्या वेदना, अपमानाचा सामना करत आहे तो संपणार नाही, असे ते म्हणाले.

ख्वाजा युनूस हा २७ वर्षांचा सॉफ्टवेअर अभियंता होता. त्याला घाटकोपर बॉम्बस्फोटाप्रकरणी अटक केली होती. त्याला कोठडीत असताना मृत्यू झाला होता. त्याचा तपास राज्याच्या सीआयडीकडून सुरू होता. युनूसच्या मृत्यूप्रकरणी १४ अधिकाऱ्यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले. या आरोपपत्रातील केवळ ४ जणांविरोधात कारवाई करायला राज्य सरकारने परवानगी दिली.

Mumbai : एफडीएने ४३ परवाने केले निलंबित; १७.८ टन साठा केला जप्त, दिवाळीत FDA ची मोठी कारवाई

दिवाळीच्या मुहूर्तावर कतरिना-विकीने पहिल्यांदाच दाखवला मुलाचा चेहरा! छोट्या विहानच्या गोड फोटोने वेधलं लक्ष

Mumbai : पावसासंबंधी माहिती वॉलवर; मुख्यालयासह परळ येथील नियंत्रण कक्ष होणार हायटेक

Mumbai : स्थायी समितीत जोरदार आतषबाजी; आधी खर्च, नंतर मंजुरी; स्थायी समितीत ५ ते ७५ लाखांचे ९० टक्के प्रस्ताव

Mumbai : केईएमचा ४२२ कोटींचा शैक्षणिक संकुल प्रकल्प; BMC डिसेंबरमध्ये काढणार निविदा