मुंबई

बोरिवलीत घराचा भाग रिक्षावर कोसळला:दोघे जखमी; इमारतीचे पाडकाम सुरू

या दुर्घटनेत रिक्षा चालक जखमी झाले असून, त्यांना जवळील श्रीकृष्णा या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Swapnil S

मुंबई : बोरिवली पश्चिम गणेश मंदिराजवळील नॅन्सी कॉलनीत तळ अधिक तीन मजली महेंद्र इमारत असून, ती धोकादायक झाल्याने रिकामी करण्यात आली आहे. इमारतीचे पाडकाम सुरू असताना शनिवारी दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर घराचा भाग रिक्षावर कोसळला. या दुर्घटनेत रिक्षा चालक जखमी झाले असून, त्यांना जवळील श्रीकृष्णा या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दोघांवर उपचार सुरू असल्याचे पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन नियंत्रण कक्षाकडून सांगण्यात आले.

या दुर्घटनेत राजकुमार लल्लनकुमार राणा यांच्या डोक्याला व हाताला मार लागला आहे, तर सुमन शुक्ला यांनाही पाठीला मार लागला असून, दोघांवर उपचार सुरू आहेत.

शिवसेना नाव, धनुष्यबाण चिन्ह कोणाचे ? १४ जुलैला सुनावणी

बाजीराव पेशव्यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमावर मस्तानी यांच्या वंशजाचा बहिष्कार

कोकणातील कातळशिल्पांचे जतन करा; मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश

गोरेगाव - मुलुंड जोड रस्ता: जुळ्या बोगद्यांच्या बांधणीचा मार्ग मोकळा

दिशा सालियनचा मृत्यू अपघातीच, मुंबई पोलीस ठाम ; भूमिका स्पष्ट करण्याचे राज्य सरकारला निर्देश